सेवापुस्तिका पडताळणीसाठी कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:45+5:302021-02-06T04:07:45+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या सुमारे बाराशे सेवापुस्तिका पडताळणीच्या प्रतीक्षेत आहेत. दीड महिन्यापासून वित्त विभागात यासाठी ...

सेवापुस्तिका पडताळणीसाठी कर्मचारी
औरंगाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या सुमारे बाराशे सेवापुस्तिका पडताळणीच्या प्रतीक्षेत आहेत. दीड महिन्यापासून वित्त विभागात यासाठी कर्मचारी नियुक्त नसल्याने शिक्षकांची प्रकरणे प्रलंबित असल्याचे शिक्षक भारतीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्या निदर्शनास आणून दिले. या कामासाठी तत्काळ कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली.
यापूर्वीही शिक्षक भारतीने मागणी केली होती. मात्र, कर्मचारी नियुक्त न झाल्याने ही कामे खोळंबली असल्याने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे यांनी केली. यावेळी सुनील चिपाटे, अनिल देशमुख, महेंद्र बारवाल, शिवकुमार जयस्वाल, प्रेमसिंग बारवाल, मच्छिंद्र भराडे, सुषमा खरे, शगुफ्ता फारुकी, रोहिणी विद्यासागर, उर्मिला राजपूत, स्वाती गवई, प्रमिला भिवसने आदी उपस्थित होते.
---