एसटी कर्मचार्यांच्या बिलाचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: May 11, 2014 00:39 IST2014-05-11T00:23:57+5:302014-05-11T00:39:11+5:30
नांदेड : २०१२ आणि १३ या वर्षात आठवडी सुटीच्या दिवशी तसेच अतिरिक्त वेळ कार्य करणार्या कर्मचार्यांची बिले मंजूर होवूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत

एसटी कर्मचार्यांच्या बिलाचे भिजत घोंगडे
नांदेड : २०१२ आणि १३ या वर्षात आठवडी सुटीच्या दिवशी तसेच अतिरिक्त वेळ कार्य करणार्या कर्मचार्यांची बिले मंजूर होवूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत यासह विविध मागण्यासंदर्भात प्रशासन चालढकल करीत असल्याने एसटी कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे़ एसटीमध्ये आवश्यकतेनुसार कर्मचार्यांना अतिरिक्त तास काम करावे लागते तसेच आठवडी सुटीदेखील रद्द करून कर्तव्यावर यावे लागते़ या कामाचा मोबदला कर्मचार्यांना मिळणे गरजेचे आहे़ पण नांदेड विभागामध्ये तसे होताना दिसत नाही़ गत दोन वर्षांपासून मंजूर होवूनदेखील अनेक कर्मचार्यांनी बिले हाती आलेली नाहीत़ त्यांना प्रत्यक्षात पैसे कधी मिळणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो़ त्याचबरोबर एखाद्या कर्मचार्यास अपघात, कॅन्सर आदी आजारासंदर्भात मिळणारे मेडिकल बिल १० किंवा २५ तारखेला मिळालेच पाहिजे, असा नियम आहे़ याही नियमाला धाब्यावर बसवत प्रशासन अनेक दिवसांपासून वैद्यकीय बिलासाठी अर्ज केलेल्या कर्मचार्याला हेलपाटे मारायला भाग पाडत आहे़ कर्मचार्यांची चूक झाल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई केली जाते़ दंडात्मक कारवाईसह वेतनवाढ थांबविण्यापर्यंतच्या कठोर शिक्षा होते़ मात्र, एसटी प्रशासनाकडून होणार्या अशा असंख्य चुकाबद्दल त्यांना कोणती शिक्षा करणार असाही प्रश्न काही कर्मचारी उपस्थित करीत आहेत़ शिलाई भत्तादेखील अनेक दिवसांपासून मिळालेला नाही़ काही मार्गावरील धाववेळ निश्चित करण्यासाठी अनेकवेळा मागणी केलेली आहे, परंतु प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली केल्या जात नाहीत़ यासंदर्भात मान्यताप्राप्त संघटनेशी संपर्क साधला असता, संघटनेच्या विभागीय सचिव शीला संजय नाईकवाडे म्हणाल्या, अनेकवेळा अर्ज, निवेदन, विनंत्या करून झाले येत्या काही दिवसांत मागण्या मान्य करून कर्मचार्यांना न्याय न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे़ दरम्यान, या प्रकारामुळे एसटी कर्मचार्यांमध्ये मात्र संतापाची भावना आहे़ (प्रतिनिधी) वाढत्या महागाईने होरपळत असलेल्या कर्मचार्यांची बिले थकवून एसटी प्रशासन काय साध्य करणार आहे, माहीत नाही़ येत्या पाच दिवसांत प्रश्न मार्गी काढले नाही तर विभागीय कार्यालयासमोर मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, अशी माहिती विभागीय सचिव शीला नाईकवाडे व विभागीय अध्यक्ष विनोद पांचाळ, एम़ बी़ बोर्डे यांनी दिली़