एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:00+5:302021-01-08T04:12:00+5:30
मध्यवर्ती बसस्थानकात एक साधी बस आणि दोन निमआराम बसच्या (एमएस) समोरील भागावर ‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर लावल्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ...

एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’
मध्यवर्ती बसस्थानकात एक साधी बस आणि दोन निमआराम बसच्या (एमएस) समोरील भागावर ‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर लावल्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास पडले. त्यांनी याविषयी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. हे स्टिकर कुठे आणि कोणी लावले, याविषयी माहिती समजू शकली नाही; परंतु याविषयी नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात अधिकारी, कर्मचारी पडले होते. या तिन्ही बस मध्यवर्ती बसस्थानकातून रवाना झाल्या. त्यानंतरही मध्यवर्ती बसस्थानकात याविषयी एकच चर्चा सुरू झाली. स्टिकर लावण्यावरून आणि काढण्यावरून वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.
नामकरणावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील नामफलकालाही रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडून संरक्षण दिले जात आहे. त्यात एसटी महामंडळाच्या बसगाड्यांवर फलक झळकले.
फोटो ओळ...
मध्यवर्ती बसस्थानकात नगरहून आलेल्या बसवर अशा प्रकारे ‘छत्रपती संभाजीनगर’चे स्टिकर लावण्यात आले होते.