मोबाईलवर एसटीचा ब्रेक

By Admin | Updated: July 3, 2014 00:18 IST2014-07-02T23:47:06+5:302014-07-03T00:18:39+5:30

बाळासाहेब जाधव , लातूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० जानेवारी २०१३ पासून मार्गावरील चालक, वाहक व मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली

St break on mobile | मोबाईलवर एसटीचा ब्रेक

मोबाईलवर एसटीचा ब्रेक

बाळासाहेब जाधव , लातूर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० जानेवारी २०१३ पासून मार्गावरील चालक, वाहक व मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील ३० कर्मचाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही लातूर विभागीय कार्यालयाचे नियंत्रक ड़ीबी़माने यांच्या उपस्थितीत करण्यात आली़
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जानेवारी २०१४ पासून मार्गावरील चालक ांना, मार्ग तपासणी पथकातील चालक पर्यवेक्षकांना कर्तव्यावर असतांना मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे़
यामुळे कर्तव्यात कसूर व अपहाराच्या घटनांना आळा बसविण्यास मोठी मदत होणार आहे़ही दूरदृष्टीता लक्षात घेवून वाहतूक व सुरक्षा दक्षता खाते यांच्या अधिकाऱ्यांच्या तीन संयुक्त समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत़ यामध्ये लातूर विभागाचे विभागीय नियंत्रक डी़बी़माने यांच्या उपस्थितीत समितीने दंडात्मक कार्यवाहीची मोहीम सुरू केली आहे़
यामध्ये जानेवारी ते जुन कालावधीत गाड्या चेक करून मोबाईलची जप्ती करणे, पहिल्या टप्प्यात १००रू दंड, दुसऱ्या टप्प्यात ५००रू, तिसऱ्या टप्प्यात मोबाईल वापरताना आढळल्यास मोबाईल जप्ती करण्याची प्रक्रिया सुरू या मोहिमेला चालू महिन्यात गती मिळाली असून सध्यापर्यंत ३० मोबाईलधारक वाहक -चालकांवर कारवाई करण्यात आली आहे़
तीन हजार वाहक चालकांना धसका़़
लातुर जिल्ह्यातील १०६५वाहक व १०९३ चालक व इतर कर्मचारी अशा एकुण ३००० कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकानी सुरू केलेल्या कार्यवाहीचा धसका लागला आहेत त्यामुळे काही कर्मचारी आपला मोबाईल व्हायब्रेटवर ठेवीत आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मोबाईल वापरणेच बंद केले आहे़ परिणामी या मोबाईल बंदमुळे वाहक -चालकांच्या कामातही सुरळीतपणा आला असल्याचे दिसून येत आहे़
आता मोबाईल जप्ती
एसटी महामंडळाच्या मार्गावरील वाहक, चालक व मार्ग तपासणी पथकातील दंडात्मक कारवाईला सामोरे गेलेले कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर असताना मोबाईल वापरताना आढळून आल्यास त्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल जप्त केला जाणार असल्याचे लातूर विभागीय कार्यालयाचे नियंत्रक ड़ीबी़माने यांनी लोकमतशी बोलतांना दिली़

Web Title: St break on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.