दहावीचा निकाल ७८.५३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 23:46 IST2017-06-13T23:44:23+5:302017-06-13T23:46:46+5:30

हिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदाही चांगला लागला आहे. नियमितचा ८0.९३ टक्के तर पुरवणी परीक्षेचा ३९ टक्के निकाल लागला लागला

SSC result 78.53 percent | दहावीचा निकाल ७८.५३ टक्के

दहावीचा निकाल ७८.५३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदाही चांगला लागला आहे. नियमितचा ८0.९३ टक्के तर पुरवणी परीक्षेचा ३९ टक्के निकाल लागला लागला असून सरासरी ७८.५३ टक्के आहे. यंदाही मुलींनीच मुलांपेक्षा वरचढ कामगिरी केली आहे. तर सेनगाव तालुक्याचा सर्वाधिक ८५.७३ टक्के निकाल लागला आहे.
हिंगोली जिल्ह्यात नियमितसाठी २0४ शाळांमधून १६८८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ९२३१ मुले तर ७६५२ मुली होत्या. यापैकी १६७४0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी १३५४७ जण उत्तीर्ण झाले. यात ७0७९ मुले व ६४६८ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७७.४७ तर मुलींचे ८५ टक्के एवढे आहे. त्यामुळे मुलींनीच यंदाही बाजी मारल्याचे दिसते.
हिंगोली तालुक्यातून ४७ शाळांतील ४२२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी तर ४१७0 प्रत्यक्ष हजर राहिले. यापैकी १७८९ मुले व १५४८ मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल ८0.0२ टक्के लागला आहे.
कळमनुरी तालुक्यातील ४५ शाळांतून ३३९६ नोंदणी केलेल्यांपैकी ३३८८ जणांनी परीक्षा दिली. यात १३२१ मुले तर १३७७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुक्याचा निकाल ७९.६३ टक्के लागला आहे.
वसमत तालुक्यातील ४४ शाळांमधून ४५४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर ४५२0 जण परीक्षेस बसले होते. यापैकी १९९५ मुले व १७७९ मुली उत्तीर्ण झाल्या असून तालुक्याचा निकाल ८३.५0 टक्के लागला आहे.
सेनगाव तालुक्यात ४२ शाळांतील नोंदणी केलेल्या २५८३ पैकी २५५0 जणांनी परीक्षा दिली. तर यापैकी १२३८ मुले व ९४८ मुली उत्तीर्ण झाल्या असून तालुक्याचा निकाल ८५.७३ टक्के आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात २६ शाळांतील नोंदणी केलेल्या २१३७ विद्यार्थ्यांपैकी २११२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ७३६ मुले तर ८१६ मुली उत्तीर्ण झाल्या. या तालुक्याचा निकाल ७३.४८ टक्के एवढा लागला आहे. हा जिल्ह्यात सर्वात कमी निकाल आहे.
हिंगोली जिल्ह्यात पुरवणी परीक्षेला १0३५ विद्यार्थ्यांनी नोंद करून १0३१ जणांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण ४0९ झाले. यात ३0४ मुले व १0५ मुली आहेत.

Web Title: SSC result 78.53 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.