शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ssc exam शेवटच्या पेपरच्या काही तास आधी वडीलांचे निधन, मुलाने मन्न घट करून दिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 19:23 IST

पेपरला जाण्यापूर्वीच सोयप या नियतीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले.

कन्नड ( औरंगाबाद ) : इयत्ता दहावीमध्ये असलेल्या सोयप पिंजारी याचा सामाजिकशास्त्र भाग  २ चा पेपर होता. पेपरचे मानसिक दडपण असतानाच पेपर सुरु होण्यास काही तासाचा आधी सोयपच्या वडीलांचे निधन झाले.  वडिलांचा मृतदेह दारात असताना परिक्षेला जावे तरी कसे? असा सवाल त्याच्या मनात घोळत होता. मात्र, एका पेपरच्या गैरहजरीने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार यामुळे सोयपने मन घट्ट करुन पेपर देण्याचा निर्णय घेतला. पेपर सुटल्यानंतर त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

नियती कुणाबरोबर कसा खेळ खेळेल हे सांगता येत नाही. मात्र, अशा परस्थितीवरही मात करता आली तर सर्वकाही जिंकल्यात जमा आहे. हेच धाडस कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय येथील सोयप पिंजारी याने दाखवले आहे. सोयपचे वडिल रशीद पिंजारी हे गादीघर मजूर होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी पहाटेच त्यांचे निधन झाले. याच दिवशी त्यांचा मुलगा सोयप याचा इयत्ता दहावी चा पेपर होता. मात्र,पेपरला जाण्यापूर्वीच सोयप या नियतीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले. वडिलांचा मृतदेह दारात असताना त्याने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला. पेपर सोडवत असतानाही सोयपच्या मनावर काय बेतले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. पण त्याने मन घट्ट करुन सामाजिक शास्त्र भाग दोन विषयाचा पेपर दिला आणि दुपारनंतर वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

मजूरीवरच होतो उदरनिर्वाहसोयप पिंजारी याच्या कुटुंबातील सर्वजण हे गादी बनवण्याचे काम करतात.हाताला काम तर पोटाला भाकर अशी काही घराची परस्थिती.वडिल रशीद पिंजारी  हे देखील मजुरी करीत होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ऐन सोयपच्या पेपर दिवशी त्यांचे निधन झाले. त्यामुळे सोयपची द्विधा मनस्थिती झाली होती पण त्याने आगोदर शिक्षणाला महत्व दिले.पेपर देऊनच त्याने अंत्यसंस्काराला हजेरी लावली.

परीक्षा केंद्र कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयइयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला सोयपचे परीक्षा केंद्रही कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय होते. त्यामुळे पेपर देऊन त्याने घर जवळ केले. यानंतर कुटुंबियांनी व गावातील नागरिकांनी रशीद पिंजारी यांच्या अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. नियतीच्या परीक्षेत तर सोयपने धाडस दाखवले मात्र,ज्या अवस्थेत त्याने विषयाचा पेपर दिला त्याचा निकाल काय हे पहावे लागणार आहे.

टॅग्स :ssc examदहावीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण