घर फोडून अडीच लाख पळविले

By Admin | Updated: June 26, 2014 00:36 IST2014-06-26T00:28:31+5:302014-06-26T00:36:51+5:30

लातूर : घराचा कडीकोंडा तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह २ लाख ६३ हजार रुपये पळविल्याची घटना शहरातील जुना औसा रोडवरील लक्ष्मीधाम कॉलनी येथे घडली़

Sprinkled the house by two and a half million | घर फोडून अडीच लाख पळविले

घर फोडून अडीच लाख पळविले

लातूर : घराचा कडीकोंडा तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह २ लाख ६३ हजार रुपये पळविल्याची घटना शहरातील जुना औसा रोडवरील लक्ष्मीधाम कॉलनी येथे घडली़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील जूना औसा रोडवरील लक्ष्मीधाम कॉलनी येथे दयानंद पाटील यांचे घर आहे़ मंगळवारी दिवसभराच्या कालावधीत घरी कुणीही नसल्याने त्यांनी घरास कुलूप लावले होते़ दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून तसेच अन्य एकाच्या घराच्या दाराचाही कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला़ घरातील लाकडी टेबलाच्या ड्रॉमधील व स्टीलच्या डब्यातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज पळविला़ याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sprinkled the house by two and a half million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.