उच्च माध्यमिक ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:14 AM2017-08-17T01:14:09+5:302017-08-17T01:14:09+5:30

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे.

 The sports block of access to higher secondary and postgraduate courses | उच्च माध्यमिक ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा खेळखंडोबा

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा खेळखंडोबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे. प्रवेशासंदर्भातील यंत्रणांच्या अपुºया नियोजनामुळे महाविद्यालयातील शिकवणीला सुरुवात होण्यास सप्टेंबर उजडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातही शेवटपर्यंत कोणत्याच शाखेला प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षसुद्धा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पदव्युत्तरची पहिली फेरी जाहीर; पण महाविद्यालये अनभिज्ञ
विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी सीईटी घेतली आहे. या सीईटीचा निकाल जाहीर केल्यानंतर तात्काळ निकाल प्रवेशप्रक्रिया राबविणे आवश्यक होते. मात्र, त्यामध्ये दिरंगाई झाल्यामुळे ११ ते १५ आॅगस्टदरम्यान पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, या फेरीमध्ये कोणत्या महाविद्यालयात आपला नंबर लागला याची यादीच विद्यापीठ प्रशासानाने संकेतस्थळावर जाहीर केली नाही. यात महत्त्वाची चूक म्हणजे, महाविद्यालयांनी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना कशाच्या आधारवर प्रवेश द्यायचा, त्या विद्यार्थ्यांचा खरोखरच नंबर लागला आहे का? याविषयी सगळा गोंधळच असल्याचे समोर आले आहे. हे समजण्याच्या आताच पहिली फेरी संपली आहे. दुसरी फेरी १६ आॅगस्टपासून सुरू झाली. ही फेरी २० आॅगस्टपर्यंत चालणार आहे.स् मात्र या यादीत कोणाचे नंबर लागले. याविषयीचीही माहिती विद्यापीठाने संकेतस्थळावर दिली नाही. जाहीर वेळापत्रकानुसार तिसरी फेरी जाहीर करण्याऐवजी स्पॉट अ‍ॅडमिशन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आदी भागातील विद्यार्थ्यांना यासाठी विद्यापीठात यावे लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नो मेरिट; प्रोव्हिजनल अ‍ॅडमिशन घ्या; २३ ला या
विद्यापीठाने प्रवेशाच्या फेºया जाहीर केल्या आहेत. या याद्या जाहीर करताना गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. कोणाला कसे प्रवेश दिले, याविषयी काहीही माहिती नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये महाविद्यालयाचा संबंध दर्शविला आहे. त्या महाविद्यालयात प्रवेश अंतिम होणार नाही.

Web Title:  The sports block of access to higher secondary and postgraduate courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.