धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
By Admin | Updated: October 12, 2016 00:06 IST2016-10-11T23:58:27+5:302016-10-12T00:06:22+5:30
लातूर : लातूर शहर व परिसरात ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
लातूर : लातूर शहर व परिसरात ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी परिवर्तन युवा संघटनेच्या वतीने जय भीम चौकातून आंबेडकर पार्कपर्यंत महाधम्म रॅली काढण्यात आली.
आंबेडकर पार्क येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याला सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नगरसेवक चंद्रकांत चिकटे, पृथ्वीराज सिरसाट, डॉ. शिवाजी जवळगेकर, लक्ष्मण खंडागळे, बसवंतअप्पा उबाळे, आर.ई. सोनकांबळे, कॉम्रेड विश्वंभर भोसले, प्रा. व्यंकट कीर्तने, अॅड. संजय सितापुरे, अॅड. बाबासाहेब गायकवाड, केशव उर्फ बाळासाहेब कांबळे, प्रा. अनंत लांडगे, संजय सोनकांबळे, संतोष सूर्यवंशी, प्रा. युवराज धसवाडीकर आदींची उपस्थिती होती. शहरातील बुद्ध गार्डन, प्रकाश नगर, विक्रम नगर, बौद्ध नगर, सुभेदार रामजी नगर, गौतम नगर, आनंद नगर येथील विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. त्रिशरण पंचशील समाज बांधवांनी ग्रहण केले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे किशोर जाधव यांच्या भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम झाला. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. (प्रतिनिधी)