स्पाईस जेटच्या परिस्थितीने प्रवाशांची वाढविली चिंता

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-17T23:56:14+5:302014-12-18T00:40:44+5:30

औरंगाबाद : देशभरासह शहरातील स्पाईस जेटचे विमान सलग दुसऱ्या दिवशीही रद्द झाले.

SpiceJet has raised concerns about passengers | स्पाईस जेटच्या परिस्थितीने प्रवाशांची वाढविली चिंता

स्पाईस जेटच्या परिस्थितीने प्रवाशांची वाढविली चिंता

औरंगाबाद : देशभरासह शहरातील स्पाईस जेटचे विमान सलग दुसऱ्या दिवशीही रद्द झाले. स्पाईस जेटच्या अशा परिस्थितीने आगामी दिवसातील तिकीट बुक केलेल्या प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. विमानतळावरील स्पाईस जेटच्या कक्षाशी संपर्क साधून पुढील उड्डाण रद्द आहे का, अशी शंका प्रवाशांकडून विचारली जात आहे.
तेल कंपन्यांनी पैसे भरल्यावरच इंधन देण्याचा पवित्रा घेतल्यामुळे स्पाईस जेटची अनेक विमाने रद्द होत असल्याचे दिसून आले. बुधवारी देशभरात जवळपास २५१ विमाने रद्द झाली. यामध्ये चिकलठाणा विमानतळावरून दिल्लीस जाणारे विमान सलग दोन दिवस रद्द झाले. या दोन्ही दिवशी विमान रद्द होण्याची माहिती ऐनवेळी देण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्पाईस जेटच्या विमानसेवेच्या अशा परिस्थितीने आगामी दिवसांत दिल्ली जाण्यासाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. अल्प दरात तिकीट मिळण्यासाठी अनेकांकडून महिना, दोन महिन्यांआधी तिकीट बुक करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे ऐनवेळी विमान रद्द झाल्याचे ऐकण्याऐवजी आधीच खबरदारी म्हणून बुधवारी अनेकांनी स्पाईस जेटशी संपर्क साधला. यावेळी उद्याचे विमान रद्द होणार का अशी विचारणा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. विमान रद्द होणार असेल, तर प्रवासासाठी दुसरी सोय करता येईल, असा विचार प्रवाशांकडून केला जात होता.
ऐनवेळी दर वाढविले
प्रवाशांची संख्या वाढण्याने अन्य विमानसेवा कंपन्यांनी आपले दर अचानक वाढविले आहे.

Web Title: SpiceJet has raised concerns about passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.