स्पाईस जेटचे औरंगाबादहून ‘टेक ऑफ ’;औरंगाबाद - दिल्ली विमानसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 09:02 IST2019-10-08T09:02:26+5:302019-10-08T09:02:26+5:30
दिल्ली सोबत हवाई कनेक्टिव्हिटी वाढली

स्पाईस जेटचे औरंगाबादहून ‘टेक ऑफ ’;औरंगाबाद - दिल्ली विमानसेवा सुरू
औरंगाबाद : विजयादशमीच्या मुहूर्तावर आज ८ ऑक्टोबरपासून स्पाईस जेटची औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी दिल्लीहून ७४ प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले, तर ११७ प्रवासी औरंगाबादहून दिल्लीला रवाना झाले.
दिल्लीहून सकाळी ७.५० वाजता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या स्पाईस जेटच्या पहिल्या विमानाला वॉटर सॅल्युट देण्यात आला.
औरंगाबादहून सध्या एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद-दिल्ली आणि दिल्ली - औरंगाबाद - मुंबई या विमानसेवेने शहर दिल्ली, मुंबई शहराबरोबर हवाई सेवेने जोडलेले आहे. स्पाईस जेटमुळे आता दिल्लीची हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ झाली आहे. यापूर्वी स्पाईस जेटची २०११ पासून औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू होती. मात्र, ३१ जानेवारी २०१५ रोजी या कंपनीच्या विमानाने औरंगाबादहून अखेरचे उड्डाण घेतले होते. ही विमानसेवा १ फेब्रुवारी २०१५ पासून बंद करण्यात आली. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरू झाली आहे.