शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडीच्या राजकारणाला वेग

By admin | Updated: April 16, 2016 01:48 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई या दोन्ही वॉर्डांतील पालिकेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला आहे. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता

औरंगाबाद : सातारा- देवळाई या दोन्ही वॉर्डांतील पालिकेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला आहे. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता धुमशान-तुफान अशी झाली. एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणारा प्रचार करीत गल्लोगल्ली रणधुमाळी सुरू होती. १७ एप्रिल रोजी दोन्ही वॉर्डांसाठी मतदान होणार असून, देवळाईत चौरंगी लढत होत आहेत, तर साताऱ्यात तिरंगी लढत होणार आहे. साताऱ्याच्या तुलनेत देवळाईमध्ये धनशक्तीच्या जोराचा जास्त वापर होणार असल्याची चर्चा आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला दोन्ही वॉर्डांमध्ये वेग आला आहे. देवळाईमध्ये शिवसेनेचे हरिभाऊ हिवाळे आणि काँग्रेसचे राजेंद्र नरवडे यांच्यातच खरी लढत होणार असल्याची एक चर्चा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होईल असाही दावा करण्यात येत आहे. काँग्रेसने दिखाऊ प्रचार न करता पूर्ण अंतर्गत प्रचारयंत्रणा राबविली आहे. नरवडे, अप्पासाहेब हिवाळे हे मुळात शिवसेनेचेच आहेत; परंतु अप्पासाहेब हे आता भाजपमध्ये, तर नरवडे हे काँग्रेसमधून आपले भाग्य अजमावत आहेत. त्यामुळे शिवसेनाविरुद्ध शिवसेना असाही प्रचार देवळाईमध्ये पाहावयास मिळाला.सेनेचे हरिभाऊ हिवाळे यांनी बहुमताने विजयी होणार असल्याचा दावा केला, तर भाजपच्या गोटातूनही विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नरवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजडही विजयी होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देवळाईत शिवसेनेसह सर्व उमेदवारांनी पूर्ण वॉर्ड पिंजून काढला. साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या पल्लवी गायकवाड, काँगे्रसच्या सायली जमादार आणि भाजपच्या सुरेखा बावस्कर यांच्यात लढत होत आहे. शिवसेनेने पदयात्रा काढून तो वॉर्ड पिंजून काढला. गायकवाड यांनी विजयी होणार असल्याचा दावा केला. जमादार आणि बावस्कर यांनीही विजयाचा दावा केला. शिवसेनेकडून पालकमंत्री रामदास कदम, संपर्कनेते विनोद घोसाळकर, खा. चंद्रकांत खैरे, भाजपचे किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, फिरोज पटेल यांनी दोन्ही वॉर्डांमध्ये ताकद पणाला लावली आहे.