प्रशासनाची गती म्हणजे मुंगीचाही अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:09 IST2018-02-06T01:09:27+5:302018-02-06T01:09:30+5:30

मुंगीच्या पावलानं प्रशासन चाललंय असे म्हटलं तर मुंगीचादेखील अपमान होईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने सरकारलाच घरचा आहेर दिला.

 The speed of administration is also the insult of ants | प्रशासनाची गती म्हणजे मुंगीचाही अपमान

प्रशासनाची गती म्हणजे मुंगीचाही अपमान

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंगीच्या पावलानं प्रशासन चाललंय असे म्हटलं तर मुंगीचादेखील अपमान होईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने सरकारलाच घरचा आहेर दिला. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत बागडे यांच्यासह आ. अतुल सावे यांनीदेखील मनपाला डीपीसीतून निधी मिळत नसल्यामुळे अर्थमंत्र्यांसोबत शाब्दिक वाद घातला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा प्रकार समोर आला.
बागडे म्हणाले, शाळा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण, पाणीपुरवठा यांच्यासह अपंगांचे अर्ज, घरकुलांचे काम, या मूलभूत गोष्टींना वेळेत पूर्णत्वास नेण्याची मानसिकता यंत्रणेने जोपासली पाहिजे. शासनाने निधी देऊनही ३ ते ४ वर्षांपासून वरील कामे होत नाहीत. ही गती मुंगीच्या पावलांचादेखील अपमान करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापुढे निवडणुकांना सामोरे जायचे आहे. प्रशासकीय पातळीवर कामे होत नसतील तर अवघड परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने अर्थमंत्र्यांसमोर भाजप आमदारांनी प्रशासनावर खापर फोडले.
खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट यांनी सुभेदारी विश्रामगृह, अ‍ॅमेझेमंट पार्कच्या निधीबाबत मुद्दे मांडले.
आ. इम्तियाज जलील म्हणाले, डीपीसीतून मिळणारा निधी हद्दीमुळे मतदारसंघात खर्च करताना अडचणी येतात. निधी आम्ही आणायचा आणि दुस-या मतदारसंघात खर्च करायचा, याबाबत उपाय समोर यावेत. कृषिसेवा, सामाजिक सेवा, पाटबंधारे विभाग मिळून ४०९ कोटींची अतिरिक्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीत घोषणा केली.

Web Title:  The speed of administration is also the insult of ants