हायवा चोरीप्रकरणी सिल्लोड, औरंगाबादेत विशेष पथक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:04 IST2021-04-12T04:04:32+5:302021-04-12T04:04:32+5:30
या चोरीप्रकरणी पोलिसांचे विशेष तपास पथक रविवारी सिल्लोड आणि औरंगाबादेत दाखल झाले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर एक संशयित असण्याचे ...

हायवा चोरीप्रकरणी सिल्लोड, औरंगाबादेत विशेष पथक रवाना
या चोरीप्रकरणी पोलिसांचे विशेष तपास पथक रविवारी सिल्लोड आणि औरंगाबादेत दाखल झाले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर एक संशयित असण्याचे सांगण्यात येत आहे. या चोरीप्रकरणी गुढ उकलण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. विशेष पथकाकडून सिल्लोडचा काही भाग आणि औरंगाबादचा तालुक्यातील काही भाग पिंजून काढण्यात आला. रविवारी दिवसभरात मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष पाईकराव, संदीप चव्हाण, रवींद्र तायडे, दीपक भंगाळे या चार जणांचे एक पथक सिल्लोड, औरंगाबादमध्ये तपास करीत आहे.
हायवा चोरीप्रकरणी पथकाच्या माध्यमातून शोध सुरू आहे. सोयगाव तहसील कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. शोध सुरू आहे.
- सुदाम शिरसाठ, पोलीस निरीक्षक, सोयगाव
महसूल कारवाईत जप्त करण्यात आलेला हायवा अज्ञातांनी तहसील कार्यालयातून पळवून नेला. याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने पुन्हा पुरवणी जबाबाअंति आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.
- प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव