स्पेशल रेल्वे रुळावर, प्रवाशांच्या खिशाला दप्पट फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:57+5:302021-02-05T04:16:57+5:30
-साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोना महामारीत विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. रेल्वे, बस व इतर सेवा ...

स्पेशल रेल्वे रुळावर, प्रवाशांच्या खिशाला दप्पट फटका
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : कोरोना महामारीत विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. रेल्वे, बस व इतर सेवा बंद केल्याने जनजीवन ठप्प झाले होते. ९ महिन्यांनंतर प्रवासी वाहतूक अनलॉकमध्ये हळूहळू सुरू करण्यात आली. सुखद आणि स्वस्त प्रवासी वाहतूक समजल्या जाणाऱ्या रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या विशेष रेल्वे म्हणून सोडल्या. त्यासह प्रवासी भाडे ही वाढविले. लॉकडाऊनमध्ये पिचलेल्या नागरिकांना भाडेवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.
लॉकडाउनपूर्वी १९ गाड्या औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून जात होत्या. दुतर्फा वाहतूक ४० फेऱ्याहून अधिक होती. सध्या पॅसेंजर गाड्या बंद केलेल्या असून त्या अद्याप सुरू नाहीत. त्याबदल्यात स्पेशल रेल्वे धावताहेत. धावताना प्रवाशांच्या खिशाला फटका देत असल्याचे दिसत आहे. रेल्वे स्थानकावर जाऊन तिकीट काढणे प्रतिबंधित असल्याने ऑनलाइन बुकिंग रिझर्वेशन घेऊनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे.
तपोवन सुरू झाल्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे. सकाळी तपोवन बऱ्यापैकी भरून गेली. दुपारी पण प्रवासी बुकिंग खचाखच असल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद शहर, औरंगाबाद ते नांदेड भाडेही वाढले आहे, लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी सहाशे रुपये मोजावे लागतात.
कोरोनापूर्वी येणाऱ्या गाड्या...
४०
कोरोनानंतर धावणाऱ्या गाड्या
३४
ऑनलाइन तिकीट बुकिंग...
सध्या स्पॉट तिकीट विक्री बंद आहे. प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट खरेदी करून रिझर्वेशननुसार प्रवास करावा लागतो. पॅसेंजर गाड्या अद्याप सोडण्यात आलेल्या नाहीत. किंचित भाडेवाढ आहे अंतरानुसार ते भाडे ठरलेले असते. काही अडचण असल्यास आम्ही व्यवस्थापनाच्या वतीने प्रवाशांना सहकार्य करतो. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवासीसेवा येथे सुरू आहे.
एल.के. जाखडे (व्यवस्थापक रेल्वे स्टेशन औरंगाबाद)
रेल्वे वाहतूकीत भूर्दंड
रेल्वेचा प्रवास अतिसुरक्षित असल्यामुळे जनसामान्यांसाठी तो परवडतो. सध्या गरिबांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. परंतु इतर वाहतुकीपेक्षा तो सोयीचा ठरतो. प्रवास करावा लागणारच.-शरद रोटे (मुंबई) प्रवासी
बस प्रवास सुरक्षीत
९ महिन्यांनंतर रेल्वे सुरू झाली असून, बससेवेपेक्षा वयोवृद्धांसाठी रेल्वे वाहतूक सुरक्षित आहे. औरंगाबाद येथून नांदेड गावाकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलो आहोत. -राजाराम वडजे (नांदेड) प्रवासी