रखडलेल्या रेल्वे कामांसाठी ‘विशेष प्रकल्प’
By Admin | Updated: March 15, 2016 00:44 IST2016-03-15T00:44:24+5:302016-03-15T00:44:24+5:30
औरंगाबाद : रेल्वेचे अनेक प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून रखडले आहेत. अशा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘दमरे’ने विशेष प्रकल्प (आयडेंटिफिकेशन प्रोजेक्ट) हाती घेतले आहेत

रखडलेल्या रेल्वे कामांसाठी ‘विशेष प्रकल्प’
औरंगाबाद : रेल्वेचे अनेक प्रकल्प २० ते २५ वर्षांपासून रखडले आहेत. अशा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘दमरे’ने विशेष प्रकल्प (आयडेंटिफिकेशन प्रोजेक्ट) हाती घेतले आहेत. यामध्ये दोन ते तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची यादी तयार केली जात आहे. यानुसार २०१६-१७ या वर्षासाठी यादी तयार केली आहे. मुदखेड-परभणी मार्गाचे दुहेरीकरण, अकोला-खंडवा हा मार्ग ब्रॉडगेज करणे आदी प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश असून, तो लवकरच पूर्ण होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता म्हणाले.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनची सोमवारी पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आजघडीला नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही आठवड्यातून दोन दिवस धावते. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता ही रेल्वे नियमित करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. याविषयी बोलताना गुप्ता म्हणाले, सध्या रेल्वे प्रशासन पुण्यासाठी नियमित रेल्वे चालविण्यासंदर्भात विचार करीत आहे. सकाळी नांदेड येथून निघून मनमाडमार्गे पुण्याला सायंकाळी पोहोचणारी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मनमाड रेल्वेस्टेशनवर अजिंठा एक्स्प्रेस ९ तास थांबते. त्यामुळे ही रेल्वे मुंबईपर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे. नगरसोल येथे थांबणारी डेमू रेल्वेही मनमाडपर्यंत नेण्याची प्रतीक्षा आहे. याविषयी काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले.
रेल्वेस्टेशन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मनपाकडून रेल्वेच्या जागेची मागणी केली जात आहे. त्यासाठी त्यांनी (पान २ वर)
३० हजार कोटी रुपये नुकसान सहन करून भारतीय रेल्वे सेवा देत आहे. रेल्वे कामांसाठी रेल्वेकडे पैसा नाही. त्यामुळे राज्य सरकार, भागीदार आणि रेल्वे बोर्ड यांच्या संयुक्त माध्यमातून गुंतवणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
४या कार्यक्रमातून रेल्वेची कामे वेगाने होतील, असे गुप्ता म्हणाले. औरंगाबादला पीटलाईन मंजूर नाही व त्यासाठी कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले.