शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

विशेष सभेची अतिघाई अंगलट

By admin | Updated: August 20, 2014 00:47 IST

औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीतील चार सदस्यांनी घाई-घाईने एलबीटी बंद करून जकात सुरू करण्याच्या मागणीसाठी विशेष सभेचे पत्र महापौर कला ओझा यांना १४ आॅगस्ट रोजी दिले होते.

औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीतील चार सदस्यांनी घाई-घाईने एलबीटी बंद करून जकात सुरू करण्याच्या मागणीसाठी विशेष सभेचे पत्र महापौर कला ओझा यांना १४ आॅगस्ट रोजी दिले होते. मात्र, व्यापाऱ्यांच्या रोषापुढे मनपाला जकात सुरू करण्याचा निर्णय कागदावरच ठेवावा लागला; परंतु विशेष सभेसाठी केलेली घाई सत्ताधाऱ्यांच्याच अंगलट आल्याचे दिसते आहे. स्थायी समितीतील चार सदस्यांनी विशेष सभा घेण्यासाठी महापौरांना पत्र दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांत सभेची नोटीस जारी करावी लागते. मात्र, पत्र देऊन पाच दिवस उलटले, तरी सभेबाबत महापौरांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. नगरसचिव प्रमोद खोब्रागडे यांनीही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी, स्थायी समितीच्या विशेष अधिकारांचे हनन झाले आहे. मीर हिदायत अली, काशीनाथ कोकाटे, संजय चौधरी, प्रीती तोतला या सदस्यांनी सभेसाठी पत्र दिले होते. व्यापाऱ्यांचा एलबीटी, जकात या दोन्ही करप्रणालींना विरोध आहे. असे असताना मनपा पदाधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण इच्छेसाठी जकात सुरू करण्याची तयारी सुरू केली होती. त्यावरून सेनेत दोन गट पडले. खा.चंद्रकांत खैरे यांनी जकातीला विरोध केला, तर इतर नेते याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत.महापौरांशी चर्चा करूमहापौर ओझा यांच्याशी विशेष सभाप्रकरणी चर्चा करण्यात येईल. जकात सुरू करण्याचा सध्या तरी काहीही विषय नाही.