सोयाबीनची सुडी जाळली; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:31 IST2017-11-03T00:31:21+5:302017-11-03T00:31:32+5:30

वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातील सोयाबीनची १५ क्विंटल अंदाजे ४५ हजार रुपयांची सुडी जाळून नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Soya bean ray burns; Filed in both cases | सोयाबीनची सुडी जाळली; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

सोयाबीनची सुडी जाळली; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातील सोयाबीनची १५ क्विंटल अंदाजे ४५ हजार रुपयांची सुडी जाळून नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरूंदा येथील फिर्यादी काशीनाथ डाकुलगे यांच्या शेतातील आरोपींतानी सोयाबीनची सुडी जाळून टाकल्याने अंदाजे १५ क्विंटल सोयाबीन जळाल्याने ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले तर शेजाºयाच्या शेतात आंथरलेल्या दोन पाईप छड्या जळाल्या आहेत. ही घटना १ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी काशीराम डाकुलगे यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलिसांत आरोपी केशव डाकुलगे, गजानन डाकुलगे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार शंकर इंगोले हे करीत आहेत.

Web Title: Soya bean ray burns; Filed in both cases