शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

...तर १ लाख १८ हजार हेक्टरवरील पेरणी वाया!

By admin | Updated: July 20, 2015 00:52 IST

उस्मानाबाद : मृग नक्षत्रात अल्पप्रमाणात पाऊस झाला झाला. याच पावसाच्या बळावर जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़

उस्मानाबाद : मृग नक्षत्रात अल्पप्रमाणात पाऊस झाला झाला. याच पावसाच्या बळावर जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ आगामी आठवड्यात पाऊस न झाल्यास सुमारे १ लाख १८ हजार ८०० क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार असल्याचे आपत्कालीन पीक नियोजन आराखड्यात नमूद केले आहे. यंदाही मागील चार वर्षांचीच री पाऊस ओढत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़ मोठा पाऊस न झाल्याने आजही जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यातील शंभरावर गावांना १४९ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात सुमारे ८३६ विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होणार असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, जिल्ह्यात आजवर केवळ १ लाख ९५ हजार ७०० क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यात बाजरी ४ हजार ५४७ हे. मका ६ हजार ६९२ हे, तुर ३० हजार ८४२ हे, सोयाबिन ८९ हजार ११६, सुर्यफूल १ हजार १९१ हेक्टर, कापुस १४ हजार ६५९ हे, भुईमूग १ हजार ३०२ हेक्टर, तीळ ७९० हेक्टर, कारळे ४४९हे तर इतर पिके मिळून ४६ हजार ११२ हेक्टर असे एकुण १ लाख ९५ हजार ७०० क्षेत्र पेरणीखाली आले. २५ जुुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडल्यास ३ लाख ११ हजार ६१६ हेक्टर पेरणी होवू शकते, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव, जळकोट, नळदूर्ग, मगंरुळ, भूम तालुक्यातील भूम, ईट, अंबी, माणकेश्र्वर, वालवड, परंडा तालुक्यातील परंडा, जवळा नि, अनाळा, सोनारी, आसू या सर्कलमध्ये जुलै महिन्यात पाऊसच झालेला नाही. उस्मानाद तालुक्यात १३ .७५ मि.मी.पाऊस झाला आहे. उस्मानाबद शहर सर्कल मध्ये १७ मि.मी., उस्मानाबाद ग्रामीण १८, तेर २२, ढोकी १८ तर जागजी सर्कलमध्ये २५ मि.मी. एवढा पाऊस पडला आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोट सर्कल मध्ये ४४, सालगरा दिवटी ३०, इटकळ ८ मिमी पाऊस झाला आहे. तसेच उमरगा सर्कल १६, मुरुम ९९, नारंगवाडी २०, मूळज २४ तर डाळींब सर्कलमध्ये पडलेल्या पावसाची नोंद १० मि.मी. एवढी आहे. लोहारा सर्कलमध्ये ४४, माकणी ८ तर जेवळीमध्ये ६८ इतका पाऊस झाला. कळंब सर्कलमध्ये ८, इटकूर १०, शिराढोण २३, येरमाळा ४, मोहा २ तसेच गोंविदपूर सर्कलमध्ये १९ मि.मी. पाऊस पडला. वाशी सर्कलमध्ये १५ मि.मी., तेरखेडा १३, तर पारगाव सर्कलमध्ये १० मि.मी. पावसाची नोंद झाली.