...तर १ लाख १८ हजार हेक्टरवरील पेरणी वाया!

By Admin | Updated: July 20, 2015 00:52 IST2015-07-20T00:46:40+5:302015-07-20T00:52:55+5:30

उस्मानाबाद : मृग नक्षत्रात अल्पप्रमाणात पाऊस झाला झाला. याच पावसाच्या बळावर जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़

Sowing of 1 lakh 18 thousand hectares! | ...तर १ लाख १८ हजार हेक्टरवरील पेरणी वाया!

...तर १ लाख १८ हजार हेक्टरवरील पेरणी वाया!

उस्मानाबाद : मृग नक्षत्रात अल्पप्रमाणात पाऊस झाला झाला. याच पावसाच्या बळावर जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ आगामी आठवड्यात पाऊस न झाल्यास सुमारे १ लाख १८ हजार ८०० क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार असल्याचे आपत्कालीन पीक नियोजन आराखड्यात नमूद केले आहे.
यंदाही मागील चार वर्षांचीच री पाऊस ओढत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़ मोठा पाऊस न झाल्याने आजही जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यातील शंभरावर गावांना १४९ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात सुमारे ८३६ विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद होणार असल्याचे चित्र आहे़
दरम्यान, जिल्ह्यात आजवर केवळ १ लाख ९५ हजार ७०० क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यात बाजरी ४ हजार ५४७ हे. मका ६ हजार ६९२ हे, तुर ३० हजार ८४२ हे, सोयाबिन ८९ हजार ११६, सुर्यफूल १ हजार १९१ हेक्टर, कापुस १४ हजार ६५९ हे, भुईमूग १ हजार ३०२ हेक्टर, तीळ ७९० हेक्टर, कारळे ४४९हे तर इतर पिके मिळून ४६ हजार ११२ हेक्टर असे एकुण १ लाख ९५ हजार ७०० क्षेत्र पेरणीखाली आले. २५ जुुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडल्यास ३ लाख ११ हजार ६१६ हेक्टर पेरणी होवू शकते, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव, जळकोट, नळदूर्ग, मगंरुळ, भूम तालुक्यातील भूम, ईट, अंबी, माणकेश्र्वर, वालवड, परंडा तालुक्यातील परंडा, जवळा नि, अनाळा, सोनारी, आसू या सर्कलमध्ये जुलै महिन्यात पाऊसच झालेला नाही.
उस्मानाद तालुक्यात १३ .७५ मि.मी.पाऊस झाला आहे. उस्मानाबद शहर सर्कल मध्ये १७ मि.मी., उस्मानाबाद ग्रामीण १८, तेर २२, ढोकी १८ तर जागजी सर्कलमध्ये २५ मि.मी. एवढा पाऊस पडला आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोट सर्कल मध्ये ४४, सालगरा दिवटी ३०, इटकळ ८ मिमी पाऊस झाला आहे. तसेच उमरगा सर्कल १६, मुरुम ९९, नारंगवाडी २०, मूळज २४ तर डाळींब सर्कलमध्ये पडलेल्या पावसाची नोंद १० मि.मी. एवढी आहे. लोहारा सर्कलमध्ये ४४, माकणी ८ तर जेवळीमध्ये ६८ इतका पाऊस झाला. कळंब सर्कलमध्ये ८, इटकूर १०, शिराढोण २३, येरमाळा ४, मोहा २ तसेच गोंविदपूर सर्कलमध्ये १९ मि.मी. पाऊस पडला. वाशी सर्कलमध्ये १५ मि.मी., तेरखेडा १३, तर पारगाव सर्कलमध्ये १० मि.मी. पावसाची नोंद झाली.

Web Title: Sowing of 1 lakh 18 thousand hectares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.