लवकरच शहर बससेवेच्या ताफ्यात पाच इलेक्ट्रिक बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 17:40 IST2021-08-24T17:39:31+5:302021-08-24T17:40:08+5:30
एएससीडीसीएलने डिझेलवर चालणाऱ्या १०० बसची सेवा शहरात प्रवासी वाहतुकीसाठी दिलेली आहे.

लवकरच शहर बससेवेच्या ताफ्यात पाच इलेक्ट्रिक बस
औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन आता शहर बससेवेत पाच इलेक्ट्रिक बस समाविष्ट करण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती एएससीडीसीएलचे मुख्य संचालक व्यवस्थापक राम पवणीकर यांनी सोमवारी येथे दिली.
यूके पॅक्टतर्फे सार्वजनिक वाहतूक नियोजन व अंमलबजावणी एजन्सीद्वारे इलेक्ट्रिक बस खरेदीबाबत आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत औरंगाबादस्मार्ट सिटी टीमनेदेखील भाग घेतला. बसचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा होती.
एएससीडीसीएलने डिझेलवर चालणाऱ्या १०० बसची सेवा शहरात प्रवासी वाहतुकीसाठी दिलेली आहे. कार्यशाळेत ई-बस व खरेदीची माहिती देण्यात आली. खर्च, चार्जिंग स्टेशन सेटअप, विविध एजन्सींशी संलग्नता व निविदा प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत पवणीकर, उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड व प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे यांनी सहभाग घेतला.