सोनोग्राफी तपासणी मोहीम थंडावली

By Admin | Updated: July 29, 2014 01:07 IST2014-07-28T23:53:50+5:302014-07-29T01:07:38+5:30

बीड: जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या झाले असल्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात उघडकीस आले आहेत.

Sonography check-up campaign stopped | सोनोग्राफी तपासणी मोहीम थंडावली

सोनोग्राफी तपासणी मोहीम थंडावली

बीड: जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या झाले असल्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात उघडकीस आले आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी केंद्र शासनाने सोनोग्राफी तपासणीची मोहीम करावी, अशा सूचना जिल्हा रुग्णालयाला दिल्या आहेत. मात्र सोनोग्राफी तपासणी मोहीम थंडावली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण घटले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने सोनोग्राफी केंद्रांना ‘एफ’ फॉर्म भरणे बंधनकारक केले आहे. गरोदर महिलांची तपासणी केल्यानंतर त्यांचा ‘एफ’ फॉर्म आॅनलाईन पद्धतीने भरण्याचे पोर्टल आरोग्य विभागाने सुरू केलेले आहे. हे सोनोग्राफी धारकांसाठी बंधनकारक आहे. यासह जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सोनोग्राफी केंद्राची दर तीन महिन्याला तपासणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने एक समितीही नेमली आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत केवळ एकाच सोनोग्राफी केंद्रावर कारवाई झाली आहे. ही कारवाई नुकतीच माजलगाव येथे डॉक्टरच्या केंद्रावर करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) यांच्या पथकाद्वारे तपासणी व्हायला हवी. मात्र याची तपासणी व्हायला हवी. यामुळे सोनोग्राफी धारकांवरचा अंकुश कमी व्हायला सुरुवात झाली आहे काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
केंद्र शासनाने दिल्या आहेत सूचना
गेल्या दीड वर्षात केवळ एकच कारवाई
राज्य शासनाने दिल्या आहेत आॅनलाईन ‘एफ’ फॉर्म भरण्याच्या सूचना
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार दर तीन महिन्याला सोनोग्राफी केंद्राची तपासणी करणे आवश्यक
तपासणी मोहीम थंडावली असल्याचे दिसत आहे चित्र

Web Title: Sonography check-up campaign stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.