सिल्लोडमध्ये अतिक्रमण काढण्यावरून काही काळ तणाव; विरोध करणारे भाजप पदाधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 13:11 IST2021-10-05T13:09:08+5:302021-10-05T13:11:27+5:30
प्रामुख्याने बड्यांच्या अतिक्रमणावर हातोडा घालण्यात येत आहे.

सिल्लोडमध्ये अतिक्रमण काढण्यावरून काही काळ तणाव; विरोध करणारे भाजप पदाधिकारी अटकेत
सिल्लोड : शहरातील आंबेडकर चौकातील अतिक्रमण तोडण्याची मोहीम सिल्लोड नगरपरिषदने मंगळवारी सकाळी सुरू केली. त्यात भाजपचे नगरसेवक किरण पवार यांचे बँकेचे, भाजप कार्यालय व जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांच्या घरासमोरील अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईस भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवल्याने काही काळ तणावाची स्थिती होती.
दरम्यान, विरोध करणाऱ्या भाजप प्रदेश सरचिटणीस इंद्रिस मुलतानी, भाजप तालुकाध्यक्ष न्यानेश्वर मोठे, भाजप कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, शहर अध्यक्ष कमलेश कटारिया, सुनील मिरकर, किरण पवार, मनोज मोरेल्लू पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सिल्लोड शहरात तणावपूर्ण शांतता आहे.