शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

काहींच्या नाका-तोंडातून उग्र दर्प! केवळ स्वच्छता नाही, 'या' व्हिटॅमिनची शरीरात कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:06 IST

दातांना घट्ट पकडून ठेवण्याचे काम हे हिरड्या करत असतात. त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहणे हे दातांसाठी आवश्यक असते. तोंडात बॅक्टेरिया वाढल्याने श्वासात दुर्गंधी निर्माण होते.

छत्रपती संभाजीनगर : सुदृढ शरीरासाठी आवश्यक असलेल्या ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता अनेक शारीरिक समस्यांना निमंत्रण देते. विशेषतः तरुणांमध्ये दात-हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास मुख दुर्गंधी आणि श्वास दुर्गंधी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. केवळ स्वच्छता राखून हा प्रश्न सुटत नाही, तर ‘व्हिटॅमिन बी १२’ ची पातळीही योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे.

दातांना घट्ट पकडून ठेवण्याचे काम हे हिरड्या करत असतात. त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहणे हे दातांसाठी आवश्यक असते. तोंडात बॅक्टेरिया वाढल्याने श्वासात दुर्गंधी निर्माण होते. हिरड्यांमध्ये दाह, रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. जिभेवर पांढऱ्या थराचा संचय होतो, त्यामुळे तोंडाचा वास खराब येतो. धूम्रपान, गुटखा, तंबाखू व खर्रा यासारख्या गोष्टींमुळे हिरड्यांना इजा पोहचते. तसेच कार्बोनेटेड शीतपेय पिणे हे हिरड्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

‘व्हिटॅमिन बी १२’ मेंदूसाठी आवश्यक पोषकतत्त्व‘व्हिटॅमिन बी १२’ हे शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे असते. हे न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यात मदत करते, मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देते आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त ठरते.

‘व्हिटॅमिन बी १२’ च्या कमतरतेने थकवासततचा थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर तो ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेचा इशारा असू शकतो. शरीरातील ऊर्जेचे उत्पादन कमी झाल्याने दिवसभर थकल्यासारखे वाटते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते.

‘व्हिटॅमिन बी १२’ वाढण्यासाठी काय कराल?आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी, सोयाबीन, डाळी, पालेभाज्या यांचा समावेश करावा. ‘व्हिटॅमिन बी १२’ची पातळी नियमित तपासावी. ‘व्हिटॅमिन बी १२’चे योग्यरित्या शोषण होण्यासाठी पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम राखावे. काही लक्षणे असल्यास वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

मुख स्वच्छतेकडे दुर्लक्ष नकोमुख व श्वासासंबंधी दुर्गंधीचे मुख्य कारण हे तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष हे आहे. जिभेची स्वच्छता ठेवणे हे मुख, श्वास दुर्गंधी टाळण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. जीवनसत्त्वांची योग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते.- डॉ. इंदिरा निलेश रोजेकर, दंत व मुख रोगतज्ज्ञ

दात, हिरड्यांवर परिणाम‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेचे दात आणि हिरड्यांवर परिणाम होतात. हिरड्यांचे खराब आरोग्य आणि वाढलेल्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे अप्रत्यक्षपणे दातांवर परिणाम होऊ शकतो.- डाॅ. विक्रांत जयस्वाल, दंत रोगतज्ज्ञ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य