जालन्यात एकता रॅलीस नागरिकांचा प्रतिसाद
By Admin | Updated: August 5, 2015 00:33 IST2015-08-05T00:19:13+5:302015-08-05T00:33:26+5:30
जालना : जातीय सलोखा कायम राखून सामाजिक एकता प्रस्तापित करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी आयोजित एकता रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जालन्यात एकता रॅलीस नागरिकांचा प्रतिसाद
जालना : जातीय सलोखा कायम राखून सामाजिक एकता प्रस्तापित करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी आयोजित एकता रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील गांधी चमन येथून सकाळी ८ वाजता या रॅलीचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, नगराध्यक्षा पार्वतीबाई रत्नपारखे, माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, आयशा खान, उद्योजक किशोर अग्रवाल, सतिश पंच, रोटरी क्लबचे भरत जैन, विनीत साहनी, भावेश पटेल, डॉ. सुभाष अजमेरा आदींची उपस्थिती होती.
ही रॅली मस्तगड, सुभाष चौक, महावीर चौक, वीर सावरकर चौक, आरपीरोड शनिमंदीर, शिवाजी पुतळा मार्ग जाऊन जैन विद्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात आला.
या रॅलीत शहरातील एम.एस जैन विद्यालय, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, उर्दू हायस्कूल, कै. नानासाहेब पाटील विद्यालय, सीटीएमके गुजराती विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थ्यांसह औद्योगिक वसाहतीमधील काही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, विविध सामाजिक, सेवा भावी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठा सहभाग नोंदविला होता. (प्रतिनिधी)