महापुरूषांच्या अवमान प्रकरणी उदगीर बंद
By Admin | Updated: May 27, 2017 23:10 IST2017-05-27T23:06:05+5:302017-05-27T23:10:57+5:30
उदगीर : विठ्ठल तिडके याने महापुरूषांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याची ‘व्हाईस क्लिप’ सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़

महापुरूषांच्या अवमान प्रकरणी उदगीर बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : जळकोट तालुक्यातील कुणकी येथील विठ्ठल तिडके याने महापुरूषांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याची ‘व्हाईस क्लिप’ सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़ दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती़ या बंदमध्ये विविध सामािजक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
उदगीर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. कार्यकर्त्यांनी शांततेत बंदचे आवाहन केले. शिवाजी चौक, शाहू चौक, शहर पोलीस ठाणे, उमा चौक, मुक्कावार चौक, हनुमान कट्टा, आर्य समाज, चौबारा, पत्तेवार चौक, मोंढा रोड आडत लाईन, शिवाजी चौक आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यावेळी विवेक सुकणे, राजकुमार अतनुरे, माधव कदम, अतुल काकडे, विजय निटुरे, अहमद सरवर, सतीश पाटील, सिद्घेश्वर बिरादार, चंद्रकांत बिरादार, राजू माने, राहुल केंद्रे, बाळासाहेब पाटोदे, ताहेर हुसेन, संजय पाटील, सुभाष कासले, साबेर पटेल आदींची उपस्थिती होती़