घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवले अन् २००० चे बिल आले १५० रुपयांवर
By साहेबराव हिवराळे | Updated: January 18, 2024 20:05 IST2024-01-18T20:04:53+5:302024-01-18T20:05:09+5:30
भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे.

घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवले अन् २००० चे बिल आले १५० रुपयांवर
वाळूज महानगर : घरातील वीज बिलावर मोठा खर्च करण्यापेक्षा सौर ऊर्जा पॅनल घरावर बसवल्यास पूर्ण घर उजळून निघत आहे. सौर ऊर्जेची वीज वापरल्यास अर्थार्जनासह सबसिडीचा लाभ मिळू शकतो. ज्यांना दोन हजारांचे बिल येत होते, ते आता १५० रुपये येत आहे. बहुतांश घरांमध्ये फक्त १ ते २ किलो वॅटची सोलार सिस्टम बसवली आहे. फ्रीज, कूलर, पंख्यासारखी घरगुती उपकरणे अशा सोलार सिस्टमवर आपण सहज चालवू शकतो. पण अनेकांच्या घरात एअर कंडिशनर बसवलेले असतात, त्यांना मोठी सौर यंत्रणा लागते.
एका दिवसात फक्त १५ युनिट वीज निर्माण...
जर तुम्ही तुमच्या घरात ३ किलो वॅटची सोलर सिस्टम बसवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला हे जाणून घ्या की, ३ किलो वॅटची सोलर सिस्टम एका दिवसात फक्त १५ युनिट वीज निर्माण करू शकते.
३ किलो व्हॅट सोलार सिस्टम बसविण्याचा खर्च
स्मार्ट ३ केवी सोलार इन्व्हर्टर
वास्तविक, बहुतेक कंपन्या तुम्हाला ३५०० व्हॅट इन्व्हर्टर देतात. याच्या साह्याने तुम्ही ३ किलो व्हॅटची सोलार सिस्टम बसवू शकता. परंतु काही कंपन्यांमध्ये ४ केवी व्हॅटचा सोलर इन्व्हर्टर मिळतो. जेणेकरून तुम्ही ३ किलो व्हॅटची सौर यंत्रणा तयार करून ४ केवी व्हॅटच्या सोलर इन्व्हर्टरवर, ३ किलो व्हॅट्सचा भार चालवू शकता.
पॅनलसाठी किती अनुदान?
भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे. कोणत्याही विक्रेत्याकडून छतावर सौर पॅनेल लावून सबसिडीसाठी अर्ज करावा. रूफटॉप सोलर पॅनल ३ केवी व्हॅटपर्यंत बसवले तर सरकारकडून ४० टक्के किंवा १ केवी सोलारसाठी १४५०० रुपये याप्रमाणे ४३५०० रुपये व याशिवाय १० किलो व्हॅटवर २० टक्के सबसिडी आहे.
- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण