सौरऊर्जेवर चालणारे ‘नालेसफाई यंत्र’

By Admin | Updated: July 20, 2016 00:29 IST2016-07-20T00:03:43+5:302016-07-20T00:29:21+5:30

औरंगाबाद : पावसाळ्यात पहिला पाऊस होताच, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा अडकून शहरातील नदी व नाले चोकअप होतात. यातूनच पीईएस पॉलिटेक्निकच्या चार विद्यार्थ्यांना एक कल्पना सुचली.

Solar energy | सौरऊर्जेवर चालणारे ‘नालेसफाई यंत्र’

सौरऊर्जेवर चालणारे ‘नालेसफाई यंत्र’


औरंगाबाद : पावसाळ्यात पहिला पाऊस होताच, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा अडकून शहरातील नदी व नाले चोकअप होतात. यातूनच पीईएस पॉलिटेक्निकच्या चार विद्यार्थ्यांना एक कल्पना सुचली. त्यातूनच त्यांनी आॅटोमॅटिक नालेसफाई यंत्र तयार केले. हे यंत्र विजेवर किंवा सोलार ऊर्जेवरही चालू शकते. नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद या संस्थांना हे नालेसफाई यंत्र उपयोगी पडणारे आहे.
शेख यासीर मोहम्मद फरहान, मोहम्मद झोएब लईक अहमद, मोहम्मद अब्दुल मोहीमब, कादरी मोहम्मद उनझर, मोहम्मद अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे चारही जण पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. शहरातील नाल्यांच्या कठड्यावर उभे राहून, निरीक्षण केले असता पॉलिथिन, प्लास्टिक, पानकापड इत्यादी कचऱ्याने तुडुंब भरलेले दिसतात. या नाल्यांच्या निरीक्षणावरून या विद्यार्थ्यांच्या मनात ही कल्पना आली. ती कल्पना त्यांनी आपल्या शिक्षकांना सांगितली. प्राचार्य टी.ए. कदम व विभागप्रमुख आशिष गायकवाड यांनी ती कल्पना सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. हे नालेसफाई यंत्र विद्यार्थ्यांनी अत्यंत माफक किमतीत निर्माण केले आहे. हे यंत्र चालविण्यासाठी त्यास सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. तसेच त्याला इलेक्ट्रॉनिक मोटारही फीट केलेली आहे. हे यंत्र वीज व सौरऊर्जेवरही चालू शकते.
यंत्रास नाल्यावर सिवरेजच्या चेंबरमध्ये व नदीच्या प्रवाहात बसविल्यास वाहून येणारे पॉलिथिन, प्लास्टिक आदी कचरा हे यंत्र सेन्सरद्वारे डिटेक्ट करते. यंत्रावर असलेल्या सेन्सरमुळे ते सुरूहोते. अडकलेला कचरा चेन डायव्ह लिफटरच्या साह्याने बाहेर फेकला जातो. नालेसफाई, सिवरेज चोकअपच्या समस्यांसाठी हे यंत्र खूपच उपयुक्त आहे.

Web Title: Solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.