समाज कल्याणची पत्रे वाटप योजना रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 00:26 IST2016-04-08T00:04:31+5:302016-04-08T00:26:45+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना

समाज कल्याणची पत्रे वाटप योजना रखडली
लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातील २० टक्के शेष फंडातून लाभार्थ्यांना पत्रे वाटप करण्यात येतात़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील घोटाळ्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून समाजकल्याणचे पत्रे वाटप ठप्प आहे़ विशेष घटक योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना दिला जातो़ मागील दोन वर्षांपासून पत्रे वाटप करण्यात आले नसूल ३ हजार ७६१ लाभार्थी वंचित राहीले आहेत़
समाजकल्याणच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना लोखंडी पत्रे वाटप केले जातात़ २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात समाजकल्याण विभागाने एकाही लाभार्थ्यांना पत्रे वाटप केले नाही़ चाकूर तालुक्यात पत्रे वाटपातील झालेला भ्रष्टाचार व त्या अनुषंगाने संबंधितांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे याचा विचार करता, लातूर जिल्हा परिषदेने २०१४-१६ अंतर्गत १ कोटी २२ लाख रुपयांच्या पत्रे वाटपासाठी सर्वसाधारण सभेकडून मंजूरीही मिळविली़ पण या ना त्या कारणाने विशेष घटक योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे पत्रे अद्यापही वाटप केले नाहीत़
परिणामी, लातूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना पत्र्यांचा लाभ मिळाला नाही़ जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून रितसर आर्थिक तरतूद करूनही पत्रे वाटपाची प्रक्रिया मात्र धिम्या गतीने सुरु आहे ़ दोन वर्षाचे सुमारे ३ हजार ७६१ लाभार्थी पत्र्यांपासून वंचित आहेत़ पारदर्शकतेच्या नावाखाली प्रक्रिया क्लीष्ट पद्धतीने राबविण्यात येत आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांचा पत्रे वाटपाचा प्रश्न रखडला आहे़ (प्रतिनिधी)