शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सलोखा, शांतता कायम राखावी - जिल्हाधिकारी

By admin | Updated: October 7, 2014 00:13 IST

नांदेड : अप्रिय घटनांचा निवडणूक काळात गैरफायदा घेतला जाऊ नये, अशी अपेक्षा आहे़

नांदेड : अप्रिय घटनांचा निवडणूक काळात गैरफायदा घेतला जाऊ नये, अशी अपेक्षा आहे़ तसे झाल्यास अशा घटकांबाबतही वेळीच माहिती द्या़ सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करा़ दरम्यान, सोशल मीडिया व अन्य माध्यमांद्वारे अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेलचे लक्ष असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले़शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे़ नांदेडवासियांनी कोणतेही दडपण व दबावाखाली न राहता दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवावेत, असे आवाहनही धीरजकुमार यांनी केले आहे़ गाडीपुरा भागातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटना परिसराची जाऊन पाहणी केली़ यासंदर्भात धीरजकुमार म्हणाले, पोलिस दल व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयातून परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण राखण्यात आले आहे़ परंतु अप्रिय घटनांच्या अडून अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच या दुर्देवी घटनेनंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण बंदोबस्त असल्याचेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)