सोशल मीडियालाही हवे ट्रॅकर
By Admin | Updated: June 2, 2014 00:51 IST2014-06-02T00:22:31+5:302014-06-02T00:51:08+5:30
लातूर : स्मार्टफोन्सच्या वापरासोबतच नेटकर्यांची अन् सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत चालली आहे़

सोशल मीडियालाही हवे ट्रॅकर
लातूर : स्मार्टफोन्सच्या वापरासोबतच नेटकर्यांची अन् सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत चालली आहे़ एका ‘टच’मध्ये ‘दुनिया मुठी’त आली आहे़ संपर्काचे ते एक प्रभावी व वेगवान माध्यम बनले आहे़ फेसबुकपाठोपाठ मार्केटमध्ये आलेल्या व्हॉट्स अॅपने तर सोशल मीडियाचे सारेच परिमाण बदलून टाकले आहेत़ कामापेक्षा करमणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर वाढल्याने आता गैरप्रकाराचे प्रमाणही वाढीस लागले आहे़ विकृत मानसिकतेच्या वापरकर्त्यांमुळे जातीय तेढ निर्माण होऊन समाजात वाद घडवून आणले जात आहेत़ या पार्श्वभूमीवर आयटीतज्ज्ञ, पोलिस व वापरकर्त्यांशी केलेल्या चर्चेतून तांत्रिक प्रतिबंधापेक्षा समाजाने नैतिक भान ठेवून सोशल मीडियाचा वापर केल्यास चांगले परिणाम दिसतील, असा सूर व्यक्त झाला़ तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज़़़ सोशल मीडियातील फेसबुक, व्हॉटस् अॅपसारखे अॅिप्लकेशन कोणत्याही गैरप्रकाराची जबाबदारी घेत नाहीत़ सोर्स शोधूनच आरोपींपर्यंत पोहोचावे लागते़ गरज असेल तर पोलिसांना अॅप्लीकेशनच्या निर्मात्यांची मदत घेता येते़ परंतु, तांत्रिकदृष्ट्या विकृत छायाचित्रे, व्हिडिओ पोस्ट करणार्यांवर तात्काळ प्रतिबंध घालता येवू शकत नाही़ चीनने गूगल पूर्णपणे बंद केले आहे़ त्याप्रमाणे भारताचे केंद्रीय दूरसंचार खाते याबाबत निर्णय घेऊ शकते़ परंतु, जनभावना लक्षात घेता ते शक्य दिसत नाही़ मात्र संबंधित सोशल मीडियास फिल्टर किंवा बंदी असणे हे दोनच पर्याय आजतरी दृष्टिपथात आहेत़ या शिवाय, ज्याप्रमाणे मोबाईल ट्रॅकर विकसित करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे अॅप्लिकेशन ट्रॅकर विकसित करणे आवश्यक आहे़ रूट ट्रॅक सोर्स अॅप्लिकेशन विकसित केल्यास अशा गैरप्रकारांवर प्रतिबंध आणता येवू शकते़ परंतु, वापरकर्त्यांनी नैतिकतेचे भान ठेवून सोशल मीडिया वापरल्यास गैरप्रकार टाळता येतील़ क्प्रा़एस़जे़ तोडकर, आयटी तज्ज्ञ़ अॅप्लिकेशनच्या अटींकडे होतेय दुर्लक्ष़़़ सोशल मीडियाच्या संबंधित अॅप्लिकेशनने रिव्यूव्हर सिस्टीम उपयोगात आणल्यास गैरप्रकारांना बर्यापैकी आळा घालता येवू शकतो, असे प्रकार केवळ अॅप्लीकेशनच थांबवू शकते़ शिवाय, रोज किती पोस्ट करायचे यालाही मर्यादा घालणे गरजेचे आहे़ सोशल मीडियात अधिक रिस्ट्रीक्शन चालत नाहीत़ असल्यास ते अॅप्लिकेशन लोकप्रिय ठरत नाही, त्यामुळे अॅप्लिकेशनधारक फिल्ट्रेशनकडे दुर्लक्ष करतात़ रजिस्ट्रेशन करतानाच वापरकर्त्यासमोर अॅप्लीकेशनच्या अनेक अटी असतात़ परंतु, वापरकर्ता त्याकडे दुर्लक्ष करतो़ शिवाय, अॅप्लिकेशनधारकही या अटीच्या आधारे आपली जबाबदारी झटकतात़ तांत्रिकदृष्ट्या अशा बाबींवर प्रतिबंध आणणे शक्य आहे़ परंतु, वाटते तितके सोपे निश्चितच नाही़ त्यामुळे समाजानेच नैतिकतेचे भान राखून आपण काय पोस्ट करतोय, त्याचे पुढील परिणाम काय याचा विचार करणे गरजेचे वाटते़ क् प्रा़डॉ़भीमाशंकर कोडगे, आयटी तज्ज्ञ़ विकृत पोस्ट डीलीट करणे राहील उत्तम़़़ सोशल मीडिया उपयुक्त आहे़ त्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांतर्गत मत व्यक्त करता येवू शकते़ परंतु, आपल्या मतामुळे कोणी दुखावणार नाही, याची काळजी वापरकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे़ आज सोशल मीडियामुळे समाजातील अनेक सकारात्मक बाबी समोर येऊ लागल्या आहेत़ चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचविण्याचे ते चांगले माध्यम आहे़ परंतु, ते जितके चांगले तितकेच घातकही ठरत आहे़ सोशल मीडियाचा वापर करताना विनाकारण कोणाच्यातरी भावना दुखावण्यासाठी बदनामीकारक छायाचित्रे, व्हीडीओ पोस्ट करण्यात येत आहेत़ परंतु, अशा पोस्ट टाकून विकृत आनंद मिळविण्यापलिकडे कोणास काहीही मिळत नाही़ विकृत पोस्ट आपल्याकडे आल्यास त्यास फॉरवर्ड न करता नष्ट करणे सर्वात चांगला पर्याय आहे़ क् विक्रांत गोजमगुंडे, सोशल मीडियाचे प्रभावी वापरकर्ते़ आयटी अॅक्टमधील तरतुदीनुसार होईल शिक्षा़़़ सोशल मीडिया किंवा इंटरनेट, संगणकाच्या माध्यमातून कोणाबद्दलही बदनामीकारक छायाचित्र, ध्वनीफित, चित्रफित, मजकूर सार्वजनिक करणे, या माध्यमातून चारित्र्यहनन करणे हा २००८ च्या आयटी अॅक्ट अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा ठरतो़ या अॅक्टमधील कलम ६६ (अ) नुसार संबंधित प्रसारकर्त्यास तीन वर्षांपर्यंत कैद तसेच आर्थिक दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे़ त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणार्यांनी आपल्या हातून गुन्हा घडणार नाही, याची काळजी घ्यावी़ अन्यथा तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई करता येवू शकते़ सामाजिक सलोखा बिघडविणार्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे़ पोलिसांची सायबर शाखा विकृत छायाचित्रे, ध्वनीफित, चित्रफित प्रसारित करणार्यांचा तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घेवू शकते़ त्यामुळे वापरकर्त्यांनी वाद निर्माण करणारे पोस्ट टाकू नयेत़ क्पोलिस प्रशासन, लातूर