जर जातीभेद नष्ट करायचा असेल तर, तो प्रथम मनातून नष्ट करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते. भागवत म्हणाले, "सुरुवातीला याचा संबंध व्यवसाय आणि कामाशी होता. मात्र नंतर, समाजात शिरली आणि भेदभावाचे कारण बनली." राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त या चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रांत संघचालक अनिल भालेरावही व्यासपीठावर उपस्थित होते.
जातीभेद नष्ट करण्यासाठी, तो मनातून नष्ट करणे आवश्यक -जातिभेदाच्या समस्येवर भाष्य करताना मोहन भागवत म्हणाले, "हा भेदभाव दूर करण्यासाठी, मनातून जातीभेद नष्ट करणे आवश्यक आहे. जर हे प्रामाणिकपणे केले तर १० ते १२ वर्षांत जातिभेद संपेल." श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना भागवत म्हणाले की, संघाचे उद्दिष्ट भारताला त्याचे सर्वोत्तम वैभव परत मिळवून देणे आणि समाजाला सोबत घेऊन जाणे आहे.
आरएसएस समजून घ्यायचे असेल, तर संघाच्या शाखांमध्ये यावे -सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले, "आरएसएस व्यक्तीच्या चारित्र्य निर्मितीद्वारे राष्ट्र उभारणीसाठी काम करते आणि ही काही प्रतिक्रिया म्हणून स्थापन झालेली संघटना नाही अथवा कुणाशी स्पर्धाही करत नाही. आरएसएसचा उद्देश भारताला आणि संपूर्ण समाजाला त्याच्या सर्वोच्च वैभवापर्यंत पोहोचवणे आहे. आरएसएस स्वतःला मोठे बनवू इच्छित नाही, तो समाजाला मोठे बनवू इच्छिते." एवढेच नाही तर, "जर लोकांना आरएसएस समजून घ्यायचे असेल, तर त्यांनी संघाच्या शाखांमध्ये यावे, असेही भागवत यावेळी म्हणाले.
Web Summary : Eradicate caste discrimination from the mind, says RSS chief Mohan Bhagwat. Speaking at an event in Sambhajinagar, he stated that if honestly pursued, caste differences could vanish within 10-12 years. He also urged people to understand RSS by visiting its branches.
Web Summary : जातिभेद को मन से खत्म करने की आवश्यकता है, आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने कहा। संभाजीनगर में एक कार्यक्रम में बोलते हुए, उन्होंने कहा कि ईमानदारी से प्रयास करने पर 10-12 वर्षों में जाति भेद खत्म हो सकता है। उन्होंने लोगों से आरएसएस को समझने के लिए इसकी शाखाओं में जाने का आग्रह किया।