झाले असे की, २९ सप्टेंबर २०१४ रोजी संपदा राजेंद्रकुमार पाटील (रा. वृंदावन कॉलनी, सातारा परिसर) या पायी घरी जात होत्या. तेव्हा पाठीमागून एका मोटरसायकलवर दोन तरुण आले व काही समजण्याच्या आत संपदा पाटील यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून ते पसार झाले. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास केला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी किरण मारुती बाहेकर (२१, रा. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) व संतोष ऊर्फ गणेश काळे (रा. राहाता, जि. अहमदनगर) या दोघांंना अटक केली. या चोरट्यांकडून संपदा पाटील यांचे हिसकावून नेलेले सोन्याचे ११ ग्रॅम वजनाचे गंठण हस्तगत करण्यात आले. रविवारी न्यायालयाच्या आदेशानुसार सदरील गंठण संपदा पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हिसकावलेले गंठण महिलेले केले परत
By | Updated: December 2, 2020 04:08 IST