शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात; सर्पमित्र शिक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:09 IST

अपघातात मृत शिक्षकाचा तीन वर्षांचा नातू जखमी झाला आहे.

करंजखेड ( छत्रपती संभाजीनगर) : समोर आलेल्या बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार सर्पमित्र असलेल्या शिक्षकाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा लहान नातू जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी करंजखेड-नागापूर रस्त्यावर घडली. सलीम अहेमद सिराज (वय ५५, रा. करंजखेड) असे मयताचे नाव आहे.

करंजखेड येथील झकेरिया उर्दू प्राथमिक शाळेचे सहशिक्षक तथा सर्पमित्र सलीम अहेमद सिराज हे नागापूर येथे घरासाठी कलर खरेदी करण्यासाठी सोमवारी दुपारी दुचाकीवर गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा ३ वर्षांचा नातूही होता. तेथून परतताना सायंकाळी ५ वाजता रस्त्यावर अचानक आलेल्या बकरीला वाचविताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व ते जोरात खाली आदळले. यात सलीम हे गंभीर जखमी झाले. तर नातवाला किरकोळ मार लागला. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ करंजखेड येथील खासगी रुग्णालयात व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

घरी लग्नाची तयारी सुरु असताना शोककळासलीम अहेमद सिराज हे शिक्षकी पेशासोबतच सर्पमित्र म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक सापांना पकडून गौताळा अभयारण्यात सोडून जीवदान दिले. त्यांचा मोठा मुलगा भारतीय सैन्यदलात आहे. लहान मुलगा रफीक अहमद याचे ७ मे रोजी लग्न असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. मात्र सलीम यांच्या जाण्याने आनंदाचे वातावरण दु:खात बदलले.फोटो.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर