सिल्लोड शहरात घोरपडीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:11+5:302021-06-28T04:04:11+5:30
घोरपडीचे मांस खाल्ल्याने शक्ती वाढते, तिच्या चरबीचे तेल लावल्याने कमरेचा त्रास कमी होतो, अशी समज असल्याने सध्या घोरपडीची मागणी ...

सिल्लोड शहरात घोरपडीची तस्करी
घोरपडीचे मांस खाल्ल्याने शक्ती वाढते, तिच्या चरबीचे तेल लावल्याने कमरेचा त्रास कमी होतो, अशी समज असल्याने सध्या घोरपडीची मागणी वाढली आहे. त्यामुळे घोरपडीची तस्करी करणाऱ्या टोळ्या तालुक्यात सक्रिय झाल्या आहेत. सिल्लोडच्या मच्छी बाजारात घोरपड विक्री केली जात असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांना मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे व अभिनव प्रतिष्ठानचे किरण पवार, डॉ. संतोष पाटील, वनकर्मचारी एस. बी. चव्हाण, विलास नरवाडे यांनी सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून त्यांनी नऊशे रुपयाला घोरपड खरेदी केली. तेव्हा घोरपड विक्री करणाऱ्यांनी वनअधिकाऱ्यांना माफी मागून यापुढे असे करणार नसल्याचे आश्वासित केले. त्यामुळे गुन्हा दाखल न करता त्यांना सोडण्यात आले. त्यांच्याकडील घोरपड अंजिठा डोंगरात सोडण्यात आली.
270621\img-20210627-wa0332.jpg
पकडलेली घोरपड समवेत वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे, एस. बी. चव्हाण व विलास नरवाडे, डॉ.संतोष पाटील दिसून येत आहे.,