शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

प्रतिबंधित मांसाची तस्करी; छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसावर जमावाचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:02 IST

चिकलठाण्यात दिवसभर कडेकोट बंदोबस्त; मांस तस्करांवर कठोर कारवाईसाठी हिंदू संघटना आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : प्रतिबंधित जनावरांच्या मांसाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून धाव घेतलेल्या गोरक्षक व पोलिसावर महिला, तरुण व अल्पवयीन मुलांच्या २० ते २५ जणांच्या जमावाने शस्त्र, लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. यात गणेश आप्पासाहेब शेळके (२४, रा. पळशी) हा गंभीर जखमी झाला. तर त्याच्यासोबतच्या पोलिस अंमलदाराला धक्काबुक्की करत गणवेश फाडण्यात आला. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या घटनेनंतर चिकलठाण्यात दिवसभर तणाव होता. सिटीचौक व केंब्रिज चौकात दोन कारवाई झाल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

केंब्रिज चौकात प्रतिबंधित मांसाची तस्करी होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यावरून केंब्रिज चौकात मांस वाहून नेणारी रिक्षा पकडली. त्याच दरम्यान दुसरी रिक्षा सुमारास चिकलठाण्यातील पुष्पक गार्डन परिसरात गेल्याचे त्यांना कळले. पोलिस अंमलदार अंकुश ढगे, गणेशने त्या दिशेने धाव घेतली. गाेरक्षक व पोलिस आल्याचे कळताच मांस तस्कर संतप्त झाले व त्यांनी जमाव जमवून दोघांवर हल्ला चढवला. चाकू, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्याने वार करत गणेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ढगे यांना धक्काबुक्की केली. ढगे यांनी त्याही परिस्थितीत गणेशला जमावाच्या तावडीतून सोडवत दुचाकीवरून रुग्णालयात भरती केले. त्याच्या पाठ, डोक्यावर खोलवर जखमा झाल्या असून, गणेशची प्रकृती चिंताजनक होती.

कडेकोट बंदोबस्त, चार संशयित ताब्यातपोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरापर्यंत चिकलठाण्यात कडेकोट बंदोबस्त तैनात होता. रात्री उशिरा संशयित इसा कुरेशी, फेरोज कुरेशी, उजेफ कुरेशी व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींमध्ये ५ महिलांचा समावेश आहे.

तीन गुन्हे दाखलपोलिसांनी गंभीर दखल घेत तीन गुन्हे दाखल केले. गणेशच्या जबाबावरून जमावावर हत्येचा प्रयत्न, मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार ढगे यांच्या तक्रारीवरून याच जमावावर सरकारी कामात हस्तक्षेपाचा, तर केंब्रिज चौकातील मांस पकडल्याचा तिसरा गुन्हा दाखल केला.

संघटना आक्रमक, आज निदर्शनेया हल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. गणेशची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. सायंकाळी हिंदू संघटनांची बैठक झाली. बैठकीत बुधवारी क्रांतीचौकात सकाळी १०:३० वाजता या घटनेविरोधात तीव्र निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला. शिवाय, मांस तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी संघटनांकडून पोलिसांना आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यावरही चर्चा झाली.

मनपा मुख्यालयाजवळ कारवाईमनपा मुख्यालयाजवळ काहींनी कत्तलीसाठी जनावरे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांनी सोमवारी रात्री ९ वाजता धाव घेत सात जनावरांची सुटका करत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी इश्तियाक अहेमद कुरेशी बाबुमिया कुरेशी, शेख साबेर शेख हुसेन याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mob attacks cow vigilantes, police over beef smuggling in Sambhajinagar.

Web Summary : A mob attacked cow vigilantes and police in Sambhajinagar over suspected beef smuggling. One vigilante was seriously injured. Tensions rose after police seized meat, leading to arrests and protests by Hindu organizations demanding strict action.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर