गौताळ्यात मौल्यवान खनिजासह एका तस्कराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:30+5:302021-06-09T04:06:30+5:30

कन्नड : औरंगाबाद जिल्ह्याचे वैभव असलेल्या गौताळा अभयारण्याला तस्करीचे ग्रहण लागले आहे. अभयारण्यात असलेली वनसंपदा चोरीच्या घटनांत वाढ झाली ...

A smuggler with valuable minerals arrested in Gautala | गौताळ्यात मौल्यवान खनिजासह एका तस्कराला अटक

गौताळ्यात मौल्यवान खनिजासह एका तस्कराला अटक

कन्नड : औरंगाबाद जिल्ह्याचे वैभव असलेल्या गौताळा अभयारण्याला तस्करीचे ग्रहण लागले आहे. अभयारण्यात असलेली वनसंपदा चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, रविवारी उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करणाऱ्या एका तस्कराला वनकर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६८ किलो मौल्यवान गारा, तसेच उत्खननाचे साहित्य जप्त करण्यात आले. बाजारात या गारांची किंमत सुमारे पावणेतीन लाख रुपये आहे.

मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवर २६० चौ.कि.मी. क्षेत्रफळावर डोंगररांगांमध्ये नैसर्गिक वनराईने नटलेले व मराठवाड्यातील सर्वात मोठे गौताळा अभयारण्य आहे. येथील जंगलात विविध प्राण्यांच्या प्रजातींबरोबरच मोठ्या प्रमाणात वनौषधी, चंदन, साग असे मौल्यवान वृक्षही आहेत, तसेच सापाच्याही अनेक प्रजाती या भागात आढळतात. येथील डोंगरांमध्ये मिळणाऱ्या मौल्यवान गौण खनिजाकडे तस्करांची नजर वळली आहे. ६ जून रोजी चाळीसगाव वनपरिक्षेत्रांतर्गत पाटणा परिक्षेत्रातील कक्ष क्र. ३०३ मध्ये गौणखनीज उत्खनन करणाऱ्या अरबाज पठाण (रा. गराडा, ता. कन्नड) यास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके, वनरक्षक राम डुकरे, अजय माहिरे, माधुरी जाधव, डी.एस. सोनार, लटपटे, चव्हाण, चाथे आदींनी अटक केली. त्याच्या ताब्यातून मौल्यवान रंगीबेरंगी गारांनी भरलेले ६८ किलो वजनाचे १३ बॉक्स, उत्खनन करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने ९ जूनपर्यंत वनकोठडी दिली आहे.

चौकट

सहा महिन्यांत दुसरी कारवाई

गौताळा अभयारण्यातून वनसंपदा चोरीची सहा महिन्यात दुसरी घटना उघडकीस आली आहे. वनउपज व मौल्यवान दगड चोरल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे २३ जानेवारी २०२१ रोजी वनविभागाने छापा टाकून गराडा येथील चार आरोपींच्या घरांतून ३०१ किलो मौल्यवान दगड, सफेद मुसळी ५ किलो १५ ग्रॅम, धामोडी डिंक ६ किलो ८४ ग्रॅम, टिकाव, कुदळ, छन्न्या, करवत आदी साहित्य जप्त केले होते. सदर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर ही दुसरी घटना घडली असून, आरोपी हा गराडा येथीलच आहे.

चौकट

जंगलातील चंदन नामशेष होण्याच्या मार्गावर

गौताळा अभयारण्यात पूर्वी चंदनाची झाडे मोठ्या संख्येने होती. मात्र, चंदन तस्करांच्या नजरा वळल्यानंतर या जंगलातून चंदनाची झाडे झपाट्याने कमी झाली आहेत. चंदनाची तस्करी रोखण्यात वन विभागाला अपयश आल्यामुळे चंदन जंगलातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

080621\img-20210608-wa0075.jpg

आरोपीच्या ताब्यातुन जप्त केलेले गौणखनिज

Web Title: A smuggler with valuable minerals arrested in Gautala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.