स्मार्ट सिटीची शुक्रवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:07 IST2017-08-10T00:07:48+5:302017-08-10T00:07:48+5:30

केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची मागील वर्षीच निवड झाली आहे.

 Smart City Friday meeting | स्मार्ट सिटीची शुक्रवारी बैठक

स्मार्ट सिटीची शुक्रवारी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची मागील वर्षीच निवड झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा निधीही महापालिकेला प्राप्त झाला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाºया कामांना अद्याप कोणतीही गती मिळालेली नाही. आतापर्यंत स्मार्ट सिटीसाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्हीच्या तीन बैठका झाल्या आहेत. चौथी बैठक ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्याच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव तथा एसपीव्हीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा उपस्थित राहणार
आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाने स्मार्ट सिटीअंतर्गत मनपाला २०० कोटींहून अधिक निधी दिला आहे. महापालिकेने हा निधी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाºया कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सीएचटूएम या प्रकल्प सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. समितीकडून अद्याप आराखडे तयार करण्याचेच काम सुरू आहे. दरम्यान, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले की, ११ आॅगस्ट रोजी आयोजित बैठकीस अपूर्व चंद्रा येणार आहेत. बैठकीत स्मार्ट सिटीचे सर्व सदस्यही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत मनपा विविध प्रस्ताव सादर करणार आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी बसेस खरेदी किंवा पर्यायी व्यवस्था आदी उपाययोजना देण्यात येणार आहेत. स्मार्ट स्कूल, लीड लाईट, घनकचरा प्रकल्प आदी प्रस्ताव राहणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. एसपीव्ही अध्यक्ष आणि सदस्य यावर अंतिम निर्णय घेतील आणि येणाºया काही दिवसांमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.

Web Title:  Smart City Friday meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.