सोनसवाडी गावात बिबट्याची दहशत
By Admin | Updated: August 10, 2014 02:03 IST2014-08-10T01:58:50+5:302014-08-10T02:03:51+5:30
सोनसवाडी गावात बिबट्याची दहशत

सोनसवाडी गावात बिबट्याची दहशत
सोयगाव : येथून जवळच असलेल्या सोनसवाडी शेतवस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून एका बिबट्याने दहशत पसरवली आहे. एक गाय, दोन बकऱ्या, दोन मेंढ्या यांचा फडशा पाडल्यानंतर शुक्रवारी रात्री वस्तीत बिबट्या घुसल्यामुळे ४० घरांची वस्ती बिबट्याच्या दहशतीखाली घरात बसून आहे.
सोयगाव शहराचाच भाग असलेली सोनसवाडी शेतवस्ती आहे. ४० घरे व सुमारे १०० ते १२५ लोक येथे राहतात. गेल्या आठ दिवसांपासून एका बिबट्याने वस्तीला हैराण केलेले आहे. आतापर्यंत एक गाय, दोन बकऱ्या व दोन मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. काल रात्री (दि. ८) गावातील ग्रामस्थ व महिला श्रावण मासानिमित्त पोथी ऐकत होते. कुत्रे भुंकायला लागल्यानंतर माकडे झाडावरून उतरून घरात घुसायला लागली आणि थोड्याच वेळात बिबट्या गावकऱ्यांना दिसला. ग्रामस्थांनी आरडाओरड केली, आग पेटवली. त्यामुळे बिबट्या तेथून पसार झाला. अख्खी रात्र गावकऱ्यांनी जीव मुठीत धरून काढली.
सकाळी वन विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती दिली. वन परिक्षेत्र अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले, तसेच पायाचे ठसे आढळल्यास नाईट व्हिजन
कॅमेरे बसवून बिबट्याचा शोध
घेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. (वार्ताहर)