शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग झोपलेले

By admin | Updated: August 26, 2014 00:39 IST

तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात

तामसा : तामसा व परिसरात नागरिकांना विषमज्वराच्या तापाने चांगलेच घेरले़ या आजाराबद्दल आरोग्य विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे़ कारण तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ तर वायफना प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांचे बेहाल होत आहेत़तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ४० ते ४५ हजार लोकसंख्या असून वायफना आरोग्य केंद्रातही तेवढीच लोकसंख्या आहे़ या रुग्णांच्या दिमतीला सध्या तरी एकच वैद्यकीय अधिकारी आहे़ नुकतीच एका वैद्यकीय अधिकाऱ्याची ३१ जुलै रोजी सेवानिवृत्ती झाली़ त्यानंतर आरोग्य प्रशासनाने या ठिकाणी नव्याने नियुक्ती केली नसल्याचे दिसून येत आहे़ तसेच वायफना आरोग्य केंद्रातील सुद्धा तीच परिस्थिती असून येथील वैद्यकीय अधिकारी मुनेश्वर येथील चंद्रपूर येथे बदली झाली आहे़ तर पूर्वीचे वैद्यकीय अधिकारी राम मुसांडे सध्या कार्यरत आहेत़ तर वायफना आरोग्य केंद्रात एका महिला डॉक्टरची नियुक्ती झाली़ पण त्या अद्याप हजर झाल्या नसल्याचे समजले़ तामसा व वायफना आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याऐवजी त्यांना बैठका, मिटींग असेच कामे सुधरत नसल्याने त्यांना नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही़नागरिकांचे आरोग्य सांभाळायचे असेल तर आरोग्य विभागाने तामसा व वायफनायेथे एक आरोग्य अधिकारी व एक महिला आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज आहे़ तसेच या दोन्ही केंद्रास औषधीसाठाही देण्याची मागणी होत आहे़ वायफना आक़ेंद्रात तामसा प्रा़आ़ केंद्राच्या जवळ असणारी काही गावे जोडण्यात आल्याने नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही़ त्यामुळे किंवा डॉक्टर वेळेवरउ उपलब्ध होत नाही़ रात्री-बेरात्री एखादा गंभीर आजाराने त्रस्त रुग्णास वायफना आरोग्य केंद्रास जोडलेल्या वडगाव बु़, नाव्हा, रावणगाव, दिग्रस, लोहा, पिंपराळा, एकराळा येथील नागरिकांना गैरसोयीचे होत आहे़(वार्ताहर)तामसा व परिसरात विषमज्वराच्या तापाने नागरिक फणफणत असून सराकरी दवाखान्यात औषधी व एखादवेळी डॉक्टर मिटींगला गेले तर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागतो़ त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ अगोदरच दुष्काळाच्या संकटात सापडलेली जनता विषमज्वर, खोकला, सर्दी, पडसे अशा आजाराने त्रस्त असली तरी आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे़ मच्छरांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून आरोग्य विभागाकडून फवारणी करण्याची गरज आहे़