तलवार विक्री करणाऱ्या सहाव्या आरोपीला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:03 IST2021-07-18T04:03:57+5:302021-07-18T04:03:57+5:30
मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी औरंगाबाद : नोकरी लावण्याचे व महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अल्पवयीन मुलीवर ...

तलवार विक्री करणाऱ्या सहाव्या आरोपीला पोलीस कोठडी
मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : नोकरी लावण्याचे व महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा सागर रायमल राठोड याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शनिवारी दिले. सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------------
मुलीशी वाईट कृत्य करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याशी वाईट कृत्य करणारा प्रल्हाद परसराम खंडागळे याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शनिवारी दिले. सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडीया यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
------------------------------------------------
दुचाकी चोरास पोलीस कोठडी
औरंगाबाद : अपार्टमेंटसमोर हॅन्डललॉक करून ठेवलेली दुचाकी चोरणारा शेख ईरफान शेख सरवर याला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी शनिवारी दिले. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
------------------------------------------
एटीएममधून रक्कम चोरणारे तिघे तुरुंगात रवाना
औरंगाबाद : एटीएमचे असेंम्बली शटर तोडून १३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत हर्सूल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शनिवारी दिले. रोहितसिंग बहादुरसिंग, संजयकुमार पाल आणि अंकुश मोर्या अशी आरोपींची नावे आहेत.
-------------------------------------------