शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

गर्भवतीसह सहा महिलांचा रात्री बसमध्येच मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:35 AM

सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही बस मंगळवारी सायंकाळी शेलगाव-नाचनवेल रस्त्यावर निकामी झाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह ६ महिलांना चक्क रात्रभर बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली.

औरंगाबाद : सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही बस मंगळवारी सायंकाळी शेलगाव-नाचनवेल रस्त्यावर निकामी झाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह ६ महिलांना चक्क रात्रभर बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे बस निकामी झाल्याचे आगाराला कळवूनही पर्यायी बस पाठविण्यात आली नाही.औरंगाबाद स्थानकावरून दुपारी १ वाजता ही बस सुटली होती. ती ५ वाजता नाचनवेलहून निघाल्यानंतर निकामी झाली. चालक, वाहकाने बस सुरूकरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळ झाली तरीही बस सुरू झालीच नाही. वाहक आर. एम. गाढे यांनी सोयगाव बस आगाराला दूरध्वनीवरून दुसरी बस पाठविण्याची विनंती केली. सिल्लोड आगार जवळ असल्याचे कारण सांगून सोयगाव आगारातील प्रमुखांनी सिल्लोडला दूरध्वनी केला व बस आणि दुरुस्ती पथकाला पाचारण करण्यास सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत सिल्लोड आगाराचे दुरुस्ती पथक आलेच नाही.चालक, वाहकाकडूनमाणुसकीचे दर्शनबसमध्ये अडकलेल्या महिला प्रवाशांना चालक व वाहकाने पायी जाऊन स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून पिण्याचे पाणी व खाण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले.