नऊ खडी क्रशर सील

By Admin | Updated: January 30, 2015 00:49 IST2015-01-30T00:45:41+5:302015-01-30T00:49:29+5:30

भूम : पर्यावरण विभागाचा परवाना आवश्यक असतानाही त्याकडे कानाडोळा करणे खडी क्रशर चालकांना चांगलेच भोवले आहे. महसूल विभागाकडू गुरूवारी तालुक्यातील नऊ खडी क्रशर सील करण्यात आले आहेत.

Six Piece Crushers Seal | नऊ खडी क्रशर सील

नऊ खडी क्रशर सील


भूम : पर्यावरण विभागाचा परवाना आवश्यक असतानाही त्याकडे कानाडोळा करणे खडी क्रशर चालकांना चांगलेच भोवले आहे. महसूल विभागाकडू गुरूवारी तालुक्यातील नऊ खडी क्रशर सील करण्यात आले आहेत.
तालुक्यामध्ये खडी क्रशरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. २०१३ च्या गौण खणिज कायद्यानुसार खडी क्रशरसाठी पर्यावरण विभागाचा परवाना आवश्यक आहे. परंत, क्रशर चालकांकडून त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याने महसूल विभागाकडून संबंधित क्रशर सील करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या कारवाईसाठी पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने गुरूवारी जवळपास नऊ केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये महाराष्ट्र खडी क्रशर ईट, शांतलिंग वाडकर क्रशर ईट, इमरजित स्टोन अंजनसोंडा, डोंबरे नागेवाडी आणि पाडोळी येथील भोईटे स्टोन क्रशर, शिवखडा स्टोन हाडोंग्री, महादेव गायकवाड , पांडुरंग पोळ आणि मनोहर देशमुख ईट या क्रशरचा समावेश आहे. सदरील कारवाईमुळे क्रशर चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
दरम्यान, सदरील कारवाई तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी पी. टी. जाधव, संजय स्वामी, तलाठी एम. के. यमलवाड, डी. ए. गुळमिरे, यु. एल. देशपांड आदींच्या पथकाने केली. दरम्यान, पर्यावरण विभागाचा पवान्यासाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. (वार्ताहर)

Web Title: Six Piece Crushers Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.