फुलंब्री तालुक्यात सहा तास मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:02 IST2021-09-23T04:02:56+5:302021-09-23T04:02:56+5:30
फुलंब्री : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहा तास जोरदार पाऊस पडला. यात काही ठिकाणी खरीप पिकाची नासाडी झाली आहे. तर ...

फुलंब्री तालुक्यात सहा तास मुसळधार
फुलंब्री : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहा तास जोरदार पाऊस पडला. यात काही ठिकाणी खरीप पिकाची नासाडी झाली आहे. तर महत्त्वाचा फुलंब्री मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहे. वाकोद प्रकल्पात ५२ टक्के पाणीसाठा आलेला आहे.
तालुक्यात मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पाऊस पडण्यास सुरुवात झाली. हा पाऊस सर्वदूर सहा मुसळधार सुरू होता. सर्वत्र पाणीच पाणी झालेले दिसून आले. गिरजा व फुलमस्ता या दोन नद्या दुथडी भरून वाहत होत्या. महत्त्वाचे म्हणजे फुलंब्री, सांजूळ हे मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर वाकोद मध्यम प्रकल्प ५२ टक्क्यावर पाणीसाठा झाला आहे. तालुक्यातील अन्य लघु व मध्यम प्रकल्प भरले असून, ही समाधानाची बाब आहे. धामणगाव, जातेगाव परिसरात जोरदार पाऊस पडला. यात कपाशी, मका पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेले दिसून आले. त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. मंगळवारी सर्व मंडळात पडलेल्या पावसाची एकूण नोंद २३८ मिमी झाली आहे, तर सरासरी ५९ मिमी नोंद झालेली आहे.
----
तालुक्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस
फुलंब्री मंडळ : ७९ मिमी
वडोदबाजार : ५६ मिमी
आळंद : ३५ मिमी
पिरबावडा : ८६ मिमी
-----
फोटो : फुलंब्री मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहे. धामणगाव येथे मकापिकाचे झालेले नुकसान दाखविताना शेतकरी एकनाथ डिडोरे.
220921\dhamangav.jpg
१ ] फुलंब्री मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहात आहे २ ] धामणगाव येथे मका पिकात पाणी साचलेले दाखविताना शेतकरी एकनाथ डीडोरे