शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

कशीशच्या खून खटल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:01 IST

Kashish murder case: पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तपास गुन्हे शाखेकडे वर्ग; चमूत २ निरीक्षक, २ उपनिरीक्षक

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीशच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. वेदांतनगर पोलिसांकडून हा तपास काढून घेत गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या पथकात दोन वरिष्ठ निरीक्षकांसह दोन उपनिरीक्षकांची नियुक्ती केली. याविषयीचे आदेश पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी काढले आहेत.

रचनाकार कॉलनीत शरणसिंग सेठी याने २०० फूट ओढत नेऊन कशीशचा २१ मे रोजी दुपारी निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला २४ तासांत बेड्या ठोकल्या. मात्र खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पोलिसांचा तपासही तेवढ्याच वेगवान पद्धतीने होऊन सज्जड पुरावे जोडावे लागणार आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डाॅ. गुप्ता यांनी तपासासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. यात सायबर ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर, वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, हवालदार सुनील बडगुजर आणि वीरेश बने यांचा समावेश आहे. मुख्य तपासी अधिकारी म्हणून निरीक्षक आघाव काम करतील.

...अन् तपासी अधिकारी बदललेघटना घडल्याच्या दिवशी गुन्हे शाखेचे निरीक्षक आघाव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मूळ फिर्याद अधिक मजबूत करण्यासाठी टायपिस्टकडे बसून चुका दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र शेजारच्या केबिनमध्ये बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आपल्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी आघाव यांना स्वत:च्या केबिनमध्ये पोलिसांकरवी बोलावून घेतले. आघाव यांनी चुका दुरुस्त करीत असल्याचा निरोप दिल्यानंतरही बोलावणे थांबले नाही. त्यामुळे आघाव यांनी तेथून काढता पाय घेतला. आता आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासी अधिकारी बदलून आघाव यांच्याकडे तपास सोपवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद