एकल महिलांचा हळदी-कुंकू सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:30+5:302021-02-05T04:17:30+5:30
भारतीय महिला फेडरेशन, राजर्षी शाहू को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी यांच्यावतीने दि. ३१ जानेवारी रोजी सर्व जातिधर्माच्या, तसेच एकल महिलांसाठी ...

एकल महिलांचा हळदी-कुंकू सोहळा
भारतीय महिला फेडरेशन, राजर्षी शाहू को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी यांच्यावतीने दि. ३१ जानेवारी रोजी सर्व जातिधर्माच्या, तसेच एकल महिलांसाठी हळदी-कुंकू व मैत्रीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकल महिलांची असणारी उपस्थिती लक्षणीय ठरली.
नव्या विचारांची पेरणी करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन संघटनेच्या राज्यअध्यक्ष स्मिता पानसरे यांनी केले.
कुंकू लावल्याने किंवा न लावल्याने कुणाच्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. स्त्रियांना आपल्या आवडीप्रमाणे वेशभूषेचा व जगण्याचा अधिकार आहे, असे डॉ. भारती गोरे यांनी सांगितले. मीनाक्षी सोळंके यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाविषयी मार्गदर्शन केले. नीता शिंगणे यांनी महिलांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती दिली. बंसी सातपुते यांनी किसान आंदोलनाची, तर गणेश काकडे यांनी महिलांसाठी असणाऱ्या गुंतवणूक योजनांची माहिती दिली. मुख्याध्यापिका दीपमाला चव्हाण, अर्जुन रसाळ, मधुकर खिल्लारे यांनीही संवाद साधला.
वाण म्हणून महिलांना सावित्रीबाई फुलेंवर आधारित पुस्तिका, अंधश्रद्धा निर्मूलन आणि रमाई मासिक देण्यात आले. वसुधा कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता भवर, कावेरी दळवी यांनी संचालन केले, तर अंजली शिंगणे यांनी आभार मानले.
फोटो ओळ :
भारतीय महिला फेडरेशन आयोजित कार्यक्रमात पुस्तकरूपी वाण घेताना महिला.