आकाशवाणी चौक आणि शासकीय दूध डेअरी चौकात सकाळी ११ ते २ पर्यंत एकेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST2020-12-30T04:07:22+5:302020-12-30T04:07:22+5:30
औरंगाबाद : जालना रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली तयार करण्याचे काम सुरू असल्यामुळे होत असलेली कोंडी लक्षात घेऊन आकाशवाणी ...

आकाशवाणी चौक आणि शासकीय दूध डेअरी चौकात सकाळी ११ ते २ पर्यंत एकेरी वाहतूक
औरंगाबाद : जालना रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली तयार करण्याचे काम सुरू असल्यामुळे होत असलेली कोंडी लक्षात घेऊन आकाशवाणी चौक आणि शासकीय दूध डेअरी चौकातील वाहतूक सिग्नल सकाळी ११ ते २ पर्यंत बंद ठेवून ऐकरी वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. ३० डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत हा निर्णय लागू असेल.
सहायक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले की, जालना रोडवर दोन्ही बाजूंनी नाली तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे सतत वाहनांची कोंडी होऊन वाहतूक मंदावते. ही बाब लक्षात घेऊन आकाशवाणी चौक आणि शासकीय दूध डेअरी चौकातील सिग्नल ७ दिवस बंद ठेवून आणि एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे. त्रिमूर्ती चौकाकडून महेशनगरकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी मोंढा नाका उड्डाणपुलाखाली यू- टर्न घ्यावा. तसेच महेशनगरकडून त्रिमूर्ती चौकाकडे जाण्यासाठी वाहनधारकांनी सेव्हन हिल पुलाकडून यू-टर्न घेऊन जावे. तसेच शासकीय दूध डेअरी चौकात रस्ता ओलांडण्यासाठी वाहनचालकांनी क्रांती चौक पुलाखालून यू- टर्न घ्यावा. दूध डेअरीकडून काल्डा कॉर्नरकडे जाण्यासाठी वाहनधारकांनी मोंढा नाका पुलाखालून यू- टर्न घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.