किरकोळ कारणावरुन एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 18:20 IST2019-02-17T18:20:28+5:302019-02-17T18:20:39+5:30
दारु प्यायला पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोघा भावांनी ३४ वर्षीय तरुणास बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री बजाजनगरातील कोलगेट चौक येथे घडली.

किरकोळ कारणावरुन एकास मारहाण
वाळूज महानगर : दारु प्यायला पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोघा भावांनी ३४ वर्षीय तरुणास बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री बजाजनगरातील कोलगेट चौक येथे घडली.
प्रभाकर पुंडलिक खरात (३४, रा. बजाजनगर) हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारा कोलगेट चौकातील हातगाडीचालक राजू गायकवाड यांना भेटण्यासाठी गेला होता. दरम्यान, ओळखीचा संतोष रामटेके (३३) याने खरात यांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने शिवीगाळ करीत वाद घातला. हा वाद मारहाणीपर्यंत गेला. तेव्हा संतोष यांनी आपला भाऊ प्रमोद (३५) याला बोलावून घेतले.
दोघा भावांनी मिळून खरात यांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यात खरात गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात संतोष रामटेके व प्रमोद रामटेके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.