सिंगल औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST2020-11-12T07:26:27+5:302020-11-12T07:26:27+5:30

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने बुधवारी ४७ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. रस्त्यावर थुंकणे १३०० रुपये, विनामास्क ...

Single Aurangabad | सिंगल औरंगाबाद

सिंगल औरंगाबाद

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने बुधवारी ४७ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. रस्त्यावर थुंकणे १३०० रुपये, विनामास्क फिरणाऱ्या ३१ व्यक्तींकडून १५ हजार ५००, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या १७ नागरिकांकडून २५०० रुपये, शहागंज येथील नाथानी होजिअरी यांनी रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल ५ हजार, सिटी चौक येथील याहीया खान प्लास्टिक विक्रेता यांच्याकडे ३२ किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याने ५ हजार रुपये, शहागंज येथील साईकृपा क्लिनिक यांनी बायोवेस्ट बाहेर टाकल्याने ५ हजार रुपये, शहरातील विविध ठिकाणी दुकानांसमोर जास्त कचरा लावला याबद्दल ८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

इतिवृत्त आता मनपा वेबसाईटवर

औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे सर्व इतिवृत्त आता वेबसाईटवर टाकण्यात आले आहेत. नागरिकांना कोणताही ठराव हवा असल्यास महापालिकेच्या वेबसाईटवर सर्व इतिवृत्त अपलोड करण्यात आल्याची माहिती सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी दिली.

Web Title: Single Aurangabad