शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर हादरलं! १ कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:57 IST

सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील घटना; चाळीसगाव घाटात फेकला मृतदेह, ५ आरोपीना ठोकल्या बेड्या

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले आहे. एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी अखेर गव्हाणे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिला. सोमवारी पहाटे ५ वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अजिंठा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ५ आरोपींना अटक केली असली, तरी एका निरपराध शेतकऱ्याचा जीव गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

असा घडला थरारतुकाराम गव्हाणे हे शनिवारी मका विकलेले पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी परतत असताना अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले. मध्यरात्री त्यांच्याच फोनवरून मुलाला फोन आला, "वडिलांचे अपहरण केले आहे, १ कोटी रुपये घेऊन तयार राहा." घाबरलेल्या मुलाने तत्काळ अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची धावपळ, पण...घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रविवारी दिवसभर आणि रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवले. विविध पथके रवाना केली. मुलाने आरोपींना पैसे देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, पोलिसांनी आरोपींना गाठण्यापूर्वीच या नराधमांनी तुकाराम गव्हाणे यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटात फेकला. ५ आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे, मात्र तुकाराम गव्हाणे यांना जिवंत वाचवू न शकल्याची हळहळ व्यक्त होत आहे. हत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer kidnapped, murdered for ransom in Chhatrapati Sambhajinagar; city shocked.

Web Summary : A farmer from Bodvad was kidnapped for a ₹1 crore ransom and murdered. His body was found in Chalisgaon Ghat. Police arrested five suspects. The incident has caused outrage in the area.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर